

लॉ क डाऊ न दरम्यान मराठी सृष्टीतील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकलेली पाहायला मिळाली. ‘संगीत देवबाभळी’ या संगीत नाटकातील आवलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री “शुभांगी सदावर्ते” देखील संगीतकार असलेल्या आनंद ओक यांच्यासोबत ११ जुलै रोजी विवाहबद्ध झाली होती. संगीत देवबाभळी या नाटकातील तिच्या भूमिकेला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. या नाटकाला आनंद ओक यांनी संगीत दिलं आहे . सवित्रीजोती या मालिकेतूनही शुभांगीने अभिनय साकारला आहे.

लॉ क डाऊ न दरम्यान कामं ठप्प झाली असल्याने शुभांगी आणि आनंदने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. अर्थात त्यांनी घेतलेला हा निर्णय आर्थिक परिस्थिमुळे नसून केवळ एक आवड आणि हाताला काम मिळावे या हेतूने घेतला असल्याचे म्हटले आहे. श्रीपाद फूड्स “न्याहारी” या नावाने शुभंगीने या नाश्ता सेंटरची सुरुवात केली आहे. याबाबत ती म्हणते की… ” श्रीपाद फूड्स ‘न्याहारी’ या आमच्या नाश्ता सेंटरची आज सुरुवात झाली. मुळात आम्ही नवरा बायको दोघेही कलाकार. लॉ क डाऊ न मधे लग्न केलं. कामं ठप्प झाली. घरगुती लाडू, पिठं आणि चटण्या घरपोच देण्याचा छोटेखानी व्यवसाय सुरु केला “श्रीपाद फूड्स” या नावाने उत्तम प्रतिसाद मिळाला. मग गणपतीत चॉकलेट मोदकांना मागणी आली. नंतर दिवाळी फराळालाही ग्राहकांनी पसंती दिली. दिवाळीतंच मनात आलेली कल्पना म्हणजे नाश्ता सेंटर. आज त्याची सुरुवात झाली. मुळात सांगण्याची गोष्ट म्हणजे आमच्यावर हे करण्याची वेळ वगैरे आली असं नसून आम्ही दोघे आमच्या आनंदासाठी हा व्यवसाय करत आहोत. कलाकार म्हणून आमच्या दोघांची कामं सांभाळून आम्ही हे करणार आहोत. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद पाठीशी असू द्या..!! ” नाशिक येथे सुरू केलेल्या त्यांच्या या छोट्या व्यवसायाची कलाक्षेत्रात चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. शिवाय एक कलाकार म्हणूनही अनेक जणांनी त्यांना पाठिंबा दिलेला पाहायला मिळतो. या दोन्ही कलाकारांनी सुरू केलेल्या व्यवसायाला निश्चित असे यश मिळो हीच सदिच्छा…