
सोनी मराठी वाहिनीवर “तू सौभाग्यवती हो” ही नवी मालिका संध्याकाळी ७ वाजता प्रसारित केली जात आहे. अभिनेता शशांक केतकरची धाकटी बहीण दीक्षा केतकर ही या मालिकेतून ऐश्वर्याची प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे. दीक्षाची ही पहिलीच मालिका असल्याने या भूमिकेबाबत ती खूपच उत्सुक असलेली दिसून येते. त्याचप्रमाणे चाहत्यांकडून मालिकेतील तिच्या निरागस अभिनयाचे देखील खूप कौतुक होताना पाहायला मिळते आहे. दीक्षा सोबत हरीश दुधाडे हा कलाकार या मालिकेतून प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे सायली परब, ज्योती चांदेकर, रोहित फाळके यांचीही साथ मालिकेला लाभली आहे. लवकरच या मालिकेत ‘चित्रा’ हे नवे पात्र दाखल होणार आहे हे पात्र साकारणार आहे अभिनेत्री “स्वप्नाली पाटील”.

चित्राचे पात्र या मालिकेत विरोधी भूमिका दर्शवणारे आहे. त्यामुळे स्वप्नालीकडे पहिल्यांदाच एक आव्हानात्मक भूमिका आलेली पाहायला मिळते आहे. पुढचं पाऊल या मालिकेनंतर स्वप्नालीकडे काही छोट्या मोठया भूमिका वगळता कुठली दमदार भूमिका आली नव्हती. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात स्वप्नाली अभिनेता आस्ताद काळे सोबत विवाहबद्ध झाली लग्नानंतरची तिची ही पहिलीच मालिका तिच्यासाठी खास ठरणारी दिसून येते.या मालिकेतून ती विरोधी भूमिका साकारणार असल्याने येत्या काळात प्रेक्षकांच्या रोषाला तिला सामोरे जावे लागणार हे निश्चित . तर मध्यंतरी आस्ताद काळे ने देखील सोशल मीडियावरून आपल्याकडे काम नसल्याचे सांगितले होते त्यानंतर ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत त्याला संग्रामची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यामुळे आस्ताद आणि स्वप्नाली हे दोघेही त्यांच्या लग्नानंतर मालिकांमधून सक्रिय झालेले दिसून येतात. आता लवकरच स्वप्नाली “जॉबलेस” या वेबसिरीजच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेबसिरीज आणि नव्या मालिकेनिमित्त स्वप्नालीला खूप खूप शुभेच्छा…