
नागराज मंजुळे दिग्दर्शित नाळ चित्रपटात अभिनेत्री “देविका दफ्तरदार ” यांनी चैत्याच्या आईची भूमिका बजावली होती. रंगभूमीपासून आपल्या अभिनयाच्या कारकीर्दिला सुरूवात केलेल्या देविकाने पुढे जाऊन वास्तुपुरुष, नितळ, देवराई, परी हुं मै, कासव, कॅरी ऑन मराठा, गर्ल्स, बेरीज वजाबाकी यासारख्या दमदार चित्रपटाच्या माध्यमातून सशक्त भूमिका साकारल्या आहेत. देविका दफ्तरदार यांच्या इतकीच त्यांची थोरली बहीणही एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मराठी सृष्टीत कार्यरत आहेत हे बहुतेकांना परिचीत नसावे आज त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊयात…

देविका दफ्तरदार यांच्या सख्ख्या बहिणीचे नाव आहे “रेणुका दफ्तरदार”. भाडीपा (भारतीय डिजिटल पार्टी) मधील “शास्त्र असतं ते…” म्हणणारी लोकप्रिय आई रेणुका दफ्तरदार यांनी त्यांच्या अभिनयातून चांगलीच गाजवली आहे. भाडीपाची निर्मिती असलेल्या ‘आई, बाप्पा आणि मी’ या व्हिडिओला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता त्यानंतर ‘आई ,मी व प्रायव्हसी’ या त्यांच्या दुसऱ्या व्हिडिओला देखील प्रचंड लोकप्रियता मिळाली. भाडीपाच्या अनेक मालिकांमधून रेणुका यांनी चाहत्यांच्या मनात आईची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोनाली कुलकर्णीसोबत “दोघी” या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात रेणुका यांनी गौरीची भूमिका साकारली होती. घो मला असला हवा, दहावी फ, बाधा, विहीर, कैरी अशा विविध धाटणीच्या चित्रपटातून त्यांनी तितक्याच ताकदीच्या भूमिका आपल्या अभिनयाने चांगल्याच गाजवल्या आहेत. त्यांच्या अभिनयात वेगळीच चमक जाणवते त्यामुळे ते पात्र अधिक प्रभावशाली दिसून येते. रेणुका आणि देविका या दोघी दमदार कलाकार बहिणींनीना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…