marathi tadka

नाकावरच्या रागाला औषध काय.. गाण्यातील हे बालकलाकार आठवतात? तब्बल ३१ वर्षानंतर आता कसे दिसतात

कळत नकळत हा चित्रपट १९८९ साली प्रदर्शित झाला होता.या चित्रपटाला अभिनेते विक्रम गोखले, सविता प्रभुणे, अश्विनी भावे, अशोक सराफ यासारखे दमदार कलाकार लाभले होते. या चित्रपटासोबतच त्यातील ‘हे एक रेशमी घरटे..’ आणि ‘नाकावरच्या रागाला औषध काय…’ ही ही गाणी लोकप्रिय ठरली होती. कळत नकळत चित्रपटातील नाकावरच्या रागाला औषध काय या गाण्यात जे दोन बालकलाकार देखील झळकलेले पाहायला मिळाले त्यांच्या बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही लागून असेल. ‘बच्चू’ आणि ‘छकुली’ अशा भूमिका साकारणाऱ्या या बालकलाकारांबद्दल आज जाणून घेऊयात…

omey ambre family photo
omey ambre family photo

कळत नकळत चित्रपटात बच्चू साकारला होता “ओमेय आंब्रे” या बालकलाकाराने तर छकुली साकारली होती “मृण्मयी चांदोरकर” हिने. चित्रपटाला इतकी प्रसिद्धी मिळून देखील आणि ह्याच मुलांच्या गाण्याला आजही लोकप्रियता मिळून देखील हि मुले आज काय करत असतील असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. ओमेय आंब्रे आज अभिनय क्षेत्रापासून खूप दूर असलेला पाहायला मिळत आहे. मुंबईतील आर ए पोदार कॉलेजमधून त्याने बीकॉमची पदवी मिळवली आहे. ओमेयचे लग्न झाले असून त्याला दोन मुलंही आहेत. सध्या तो आपल्या कुटुंबासोबत न्यू जर्सी येथे स्थायिक झाला आहे. अनेक वर्षांपासून तो परदेशात स्थायिक असल्याचं दिसून येत.

mrunmayee chandorkar photos
mrunmayee chandorkar photos

तर चित्रपटातली छकुली अर्थात मृण्मयी चांदोरकर ही प्रसिद्ध लेखक व.पू.काळे यांची नात आहे. व. पू. काळे यांचे पूर्ण नाव वसंत पुरुषोत्तम काळे. एक सुप्रसिद्ध लेखक, कथाकथनकार आणि कादंबरीकार म्हणूनही त्यांची एक वेगळी ओळख आहे. त्यातील ही वाट एकटीची, ठिकरी, साथी अशी पुस्तके खूपच प्रसिद्धी मिळवून गेली. त्यांची मुलगी “स्वाती चांदोरकर” या देखील एक प्रसिद्ध लेखिका म्हणून ओळखल्या जातात. एक पायरी वर, अनाहत, काळाक भिन्न, शेष, उत्खनन ही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. “मृण्मयी चांदोरकर” ही स्वाती चांदोरकर यांचीच मुलगी. एक बालकलाकार म्हणून मृण्मयीने कळत नकळत चित्रपटात काम केले होते. परंतु पुढे मात्र ती कधी कोणत्या चित्रपटात पाहिली गेली नाही. मृण्मयीचेही लग्न झाले असून ती आपल्या घर संसारात रमली आहे शिवाय स्टार इंडियाशी ती निगडित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button