apurva nemlekar photo

रात्रीस खेळ चाले २ मालिकाफेम शेवंता अर्थात ही भूमिका गाजवणाऱ्या अपूर्वा नेमळेकर हिने आपल्या चाहत्याने विचारलेल्या एका प्रश्नावर भन्नाट असे उत्तर दिलेले पाहायला मिळत आहे. अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेनंतर झी युवा या वाहिनीवर सुरू होत असलेल्या “तुझं माझं जमतंय” या मालिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. ही मालिका ४ नोव्हेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता झी युवा वाहिनीवर प्रसारित होत आहे. तिच्या या आगामी मालिकेचा प्रोमो देखील व्हायरल होत आहे ज्यात ती शेवंताप्रमाणेच आणखी एका भूमिकेत दिसणार असल्याचे जाणवते.

actress apurva nemlekar
actress apurva nemlekar

याचवरून तिच्या एका चाहत्याने अपूर्वाला एक प्रश्न विचारला की, “तुमचा लूक बघून सगळे सीरिअलवाले तुम्हाला बाहेरवालीचाच रोल देतात का?.” चाहत्याच्या या प्रश्नावर अपूर्वाने देखील भन्नाट अशी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, “अजून सीरिअलचा एकही एपिसोड टेलिकास्ट पण नाही झाला…तुम्ही आधीच ठरवून टाकलंत?…आणि मुळात कसंय…”Innocent_boy” नाव ठेवून तुम्ही पण इनोसेंट होत नाही ना…” अपूर्वाच्या या प्रतिक्रियेवर काही चाहत्यांनी तिची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. बऱ्याचदा मालिकेच्या प्रोमोवरूनच आपण आपली त्या मालिकेबद्दलची चांगली, वाईट प्रतिक्रिया ठरवत असतो. परंतु जेव्हा ही मालिका प्रत्यक्षात पाहिली जाते त्यावेळी काहींचे त्याबाबतचे मत बदलुही शकते. म्हणून केवळ मालिकेच्या प्रोमोवरूनच ती कशी आहे याचा अंदाज बांधू नका एवढेच मत अपूर्वाने आपल्या आगामी मालिकेबद्दल व्यक्त केले आहे.

apurva nemlekar insta
apurva nemlekar insta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *