जरा हटके

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अभिनेत्रीचा मुळशी पॅटर्न चित्रपट अभिनेत्यासोबत झाला साखरपुडा

तुझ्यात जीव रंगला मालिकेत राणाला कुस्ती शिकवण्यासाठी आलेली सखी म्हणजेच अभिनेत्री ऋचा आपटे हिने गुपचूप साखरपुडा केला असल्याचे आपल्या इंस्टाग्रामवरून चाहत्यांना कळवले आहे. गेल्या वर्षी याच दिवशी तिने हा साखरपुडा केला असल्याने तिच्या चाहत्यांना हा सुखद धक्का बसला आहे. ऋचा आपटे हिने मुळशी पॅटर्न चित्रपटातील अभिनेता क्षितिज दाते सोबत हा साखरपुडा केला असून त्याने देखील आजच ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

rucha and kshitij
rucha and kshitij

ऋचा आणि क्षितिज बन मस्का या झी युवावरील मालिकेतून एकत्रित काम करत होते. इथेच त्यांच्या प्रेमाचे सूर जुळून आले असे म्हणायला हरकत नाही. क्षितिज अभिनेता तसेच दिग्दर्शक म्हणून मराठी सृष्टीत कार्यरत आहे. मुळशी पॅटर्न चित्रपटात त्याने साकारलेली गण्याची भूमिका अधोरेखित करणारी ठरली आहे. याशिवाय सरसेनापती हंबीरराव या आगामी चित्रपटातही तो एका महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. प्राणी- मात्र चे दिग्दर्शन क्षितिजने निभावले असून मालिका, नाटक आणि चित्रपटातून तो सक्रिय असलेला पाहायला मिळतो आहे. तर ऋचा आपटे सोनी मराठी वाहिनीवरील अस्सं माहेर नको गं बाई या मालिकेत मुक्ताची भूमिका साकारत आहे. याशिवाय अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांतून तिने महत्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. तब्बल एक वर्षानंतर या दोघांनी केलेल्या साखरपुड्याच्या बातमीने चाहत्यांनी तसेच कलाकारांनी देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आता हे दोघे लग्न कधी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button