मराठी सृष्टीतील बहुतेक कलाकार अभिनया व्यतिरिक्त व्यवसाय क्षेत्रात उतरलेली पाहायला मिळतात. यात अगदी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका गाजवणारे शंतनू मोघे, देवयानी मालिकाफेम संग्राम साळवी यांनी स्वतःचे कॅफे हाऊस सुरू केले आहेत तर दोन दिवसांपूर्वीच मराठी बीग बॉस 2 विजेता शिव ठाकरे ने B. REAL नावाने स्वतःचा ब्रँड असलेला डिओड्रंट लॉंच केला आहे. या यादीत आता आणखी एका अभिनेत्याने उडी घेतलेली पाहायला मिळते आहे.

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी अभिनयाव्यतिरिक्त आता एका नव्या व्यवसायात उतरलेला पाहायला मिळतो आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेमुळे कोल्हापूरकरांनी हार्दीकला भरभरून प्रेम दिले होते त्यामुळे त्याच्या या नव्याने सुरू होत असलेल्या व्यवसायाची सुरुवात देखील तो आता कोल्हापूरमधूनच करणार आहे. काल २५ फेब्रुवारीला कोल्हापूर मधील खाऊगल्ली खास बाग मैदान येथे “कोल्हापूर बदाम थंडाई ” या नावाने त्याने स्वतःचा ब्रँड असलेला व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायातून तो बदाम मिल्कशेक आणि काजू मिल्कशेकच्या खास व्हरायटी आपल्या चाहत्यांना खाऊन सुदृढ राहण्यास सांगत आहे. या व्यवसायाच्या नावाने त्याने फेसबुक पेज देखील सुरू केले असून खवय्यांना येथे येण्याचा आग्रह केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या एक्झिट नंतर हार्दीकने घोडस्वारी करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता त्यानुसार तो लवकरच एका आगामी चित्रपटाच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. हार्दिकला त्याच्या नव्या व्यवसायानिमित्त तसेच नव्या प्रोजेक्टनिमित्त शुभेच्छा