
झी युवा वाहिनीवर सध्या डॉक्टर डॉन हि मालिका चांगलीच गाजतेय. अभिनेता देवदत्त नागे आणि अभिनेत्री तसेच निर्माती श्वेता शिंदे ह्या दोघांची आगळी वेगळी लव्हस्टोरी ह्यात दर्शवली आहे. अभिनेत्री श्वेता शिंदे हीने शालेय शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी मुंबई गाठली होती. मुंबईत गेल्यावर मॉडेलिंग क्षेत्रात तिने पदार्पण केले. इथेच तिला हिंदी मराठी मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. “लक्ष्य ” मालिकेतली तिने साकारलेली इन्स्पेक्टर त्यावेळी चांगलीच भाव खाऊन गेली होती.

चार दिवस सासूचे, अवघाची संसार, काटा रुते कुणाला या मराठी मालिकेसोबतच कुमकूम, घराना या हिंदी मालिका तिने अभिनित केल्या. धतींग धिंगाणा, लाडीगोडी, आभास हा, अधांतरी, ईश्श या चित्रपटाखेरीज तिने मनोमिलन आणि प्रेम नाम है मेरा हे रंगभूमीवरील नाटके गाजवली. “अपराधी कौन” या मालिकेतून संदीप भन्साळी या अभिनेत्यासोबत श्वेताची ओळख वाढली आणि या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. २००७ साली पुण्यात अगदी मोजक्या मंडळींना आमंत्रित करून दोघांनी लग्नाची गाठ बांधली. संदीप भन्साळी याने हिंदी टीव्ही मालिकेत महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. वो रेहनेवाली मेहलों की ,ईश्वर साक्षी, क्रिस और क्रीष्णा, मोहिनी या गाजलेल्या मालिका त्याने अभिनित केल्या आहेत. प्यार के दो नाम, एक राधा एक श्याम मालिकेत त्याने विरोधी भूमिका साकारली होती. श्वेता शिंदे निर्मिती क्षेत्रात उतरली, लागींर झालं जी मालिकेच्या यशानंतर साता जल्माच्या गाठी आणि मिसेस मुख्यमंत्री या मालिकेची निर्मितीही तिने केली.

काही काळ अभिनयापासून दुरावलेली श्वेता पुन्हा डॉक्टर डॉन या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर आली. तर संदीप भन्साळी अभिनय क्षेत्रापासून दूर जात आपला पुण्यातील बिजनेस सांभाळताना दिसत आहे. साताऱ्यातही त्यांचा कपड्यांचा भलामोठा व्यवसाय आहे आता ते पुण्यातही याच व्यवसायात उतरले आहेत. “हरी ओम साडी डेपो” या नावाने त्याने आपले होलसेल कपड्यांचे आलिशान दुकान थाटले आहे. पुण्यातील फुरसुंगी परिसरात पुणे सासवड रोडवरील एच पी पेट्रोल पंपासमोर त्याचे हे होलसेल साड्यांचे दुकान स्थित आहे. या व्यवसायात त्याने आता चांगलाच जम बसवला असून त्यातून लाखोंची उलाढाल झालेली पाहायला मिळते. एक अभिनेता अभिनयाव्यतिरिक्त व्यवसायातही चांगले काम करून दाखवू शकतो ह्याचे हे उत्तम उदाहरण. अभिनेत्री श्वेता शिंदे आणि पती संदीप भन्साळी ह्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ..