Breaking News
Home / जरा हटके / झपाटलेला चित्रपट आहे या हॉलिवूड चित्रपटाची हुबेहूब कॉपी पाहून थक्क व्हाल

झपाटलेला चित्रपट आहे या हॉलिवूड चित्रपटाची हुबेहूब कॉपी पाहून थक्क व्हाल

झपाटलेला चित्रपट आपल्या सर्वांच्या चांगल्याच परिचयाचा आहे. आपण लहान पणापासून एक दोन वेळा नव्हे तर कित्तेकदा हा चित्रपट पाहिला असेल. ह्या चित्रपटामुळे फक्त लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांनाच नाही तर चित्रपटातील सर्वच कलाकारांना अमाप प्रसिद्धी मिळाली. पण अनेकांना हे माहित नसेल कि हा चित्रपट एका हॉलिवूड चित्रपटाची अगदी हुबेहूब कॉपी आहे. झपाटलेला हा चित्रपट ‘चाइल्डस प्ले’ या चित्रपटाची कॉपी आहे हा चित्रपट १९८८ साली रिलीज झाला होता आणि ह्याचे एकूण ३ पार्ट बनवण्यात आले होते. ह्याच चित्रपटाची प्रसिद्धी पाहुण दिग्दर्शक महेश कोठारे यांनी १९९३ साली झपाटलेला चित्रपट काढून एक धाडसी पाऊल उचललं. भारतात ह्यापूर्वी कधीही अश्या प्रकारचा चित्रपट बनला नव्हता महेश कोठारे यांनी उत्तम स्टारकास्ट निवडून हा चित्रपट बनवला आणि त्याला अमाप प्रसिद्धी देखील मिळाली.

zapatlela movie tatya vinchu
zapatlela movie tatya vinchu

अनेकांना असं वाटत कि झपाटलेला हा कोणा चित्रपटाची मुळीच कॉपी असू शकत नाही पण खरंतर तस नाहीये. झपाटलेला चित्रपट येण्याआधीच हॉलिवूडमध्ये १९८८ साली चाइल्डस प्ले बनला होता. झपाटलेला चित्रपटाची हि संकल्पना ह्याच चित्रपटातून घेतली गेली आहे. काही फोटोमधून आम्ही ह्याच स्पष्टीकरण देण्याचा एक छोटासा प्रयत्न देखील केला आहे. झपाटलेला चित्रपटात सुरवातीला बाबा चमत्कार तात्या विंचूला अमर होण्याचा मंत्र देतो त्या मंत्राचा वापर करून मरतेवेळी तात्या विंचू त्याचा बाहुल्यावर प्रयोग करतो आणि बाहुल्यात तात्या विंचू याचा आत्मा जातो. अगदी ह्याच प्रमाणे चाइल्डस प्ले या चित्रपट देखील चक्की (chucky) दाखवला आहे. ज्याप्रमाणे महेश कोठारे त्याचा खात्मा करतो त्याच प्रमाणे चाइल्डस प्ले चित्रपट देखील इन्स्पेक्टर खुंखार डाकुचा खात्मा करतो आणि तो डाकू मंत्रांचा वापर करून त्याचा आत्मा बाहुल्याच्या आत टाकण्यात यशस्वी होतो.

actor mahesh kothare in zapatlela movie
actor mahesh kothare in zapatlela movie

पण पुढे चाइल्डस प्ले ह्या चित्रपटात एक लहान मुलगा दाखवला आहे ज्याच्याकडे हि बाहुली जाते आणि झपाटलेला चित्रपटात हि बाहुली लक्ष्मीकांत ह्याच्याकडे जाताना पाहायला मिळते. ह्या चित्रपटात फक्त लहान मुलाची जागा लक्ष्मीकांत ह्याने घेतली आणि त्याच्या सोबत त्याची प्रेयसी आवडी हिची देखील भर पडली. चाइल्डस प्ले हा लहान मुलावर आधारित भयावह चित्रपट असल्याने ह्यामध्ये झपाटलेला चित्रपटासारख्या गमती जमती घडताना पाहायला मिळत नाहीत. लक्ष्मीकांत ह्यांनी ह्या चित्रपटात जो रंग भरला तसा रंग मात्र ह्या चाइल्डस प्ले चित्रपट पाहायला मिळाला नाही हीच झपाटलेला चित्रपटाची जमेची बाजू म्हणावी लागेल. चाइल्डस प्ले चित्रपटात पुढे काही खू’ न होतात आणि ते हा लहान मुलगा त्याची साक्ष असतो पण तो अनेकांना ह्याबाबत सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय असं लोकांना वाटतं. बाहुला असं काही करूच शकत नाही असं म्हणत त्याला वेड्यांच्या हॉस्पिटल मध्ये भरती करतात. झपाटलेला चित्रपटात देखील लक्ष्मीकांत सोबत असच घडताना दाखवलं आहे. हा चित्रपट पाहताना तुम्हाला दोन्ही चित्रपटात किती साम्य आहे हे देखील दिसून येईल.

lakshmikant berde in zapatlela movie
lakshmikant berde in zapatlela movie

पुढे तो बाहुला पुन्हा माणसाच्या रूपात येण्यासाठी मांत्रिकाला भेटतो तेंव्हा तो मांत्रिक त्याला तू ज्याला कुणाला आपलं नाव सर्वात पहिल्यांदा सांगितलं असशील त्याच्याच शरीरात तुला प्रवेश मिळेल असं म्हणतो अगदी हाच सीन जसाच्या तसा झपाटलेला ह्या चित्रपटात घेतलेला पाहायला मिळतो. हा बाहुला त्या मुलाच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी मेंटल हॉस्पटल मध्ये जातो तो सीन देखील झपाटलेला चित्रपटात चांगल्या पद्धतीने दाखवलेला पाहायला मिळतो. ह्या चित्रपटात एक वेगळी गोष्ट म्हणजे झपाटलेला चित्रपटात कुबड्या खविस शेवटपर्यंत तात्या विंचू ह्याची साथ देतो. पण चाइल्डस प्ले ह्या चित्रपटात सुरवातीला जेंव्हा पोलीस डाकूला मारायला येतो तेंव्हा त्याचा मित्र त्याला सोडून पळून जातो असं दाखवण्यात आलं आहे. पण नंतर मात्र तो बाहुल्याच्या रूपात येऊन सोडून गेलेल्या साथीदारांचा बदला देखील घेताना दाखवलं आहे. बाहुला मंत्र म्हणताना तो लक्ष्याच्या छातीवर हात ठेऊन म्हणताना पाहायला मिळतो तर इकडे बाहुला दोन्ही डोळ्यांच्या मधोमध हाथ ठेऊन मंत्र म्हणताना पाहायला मिळतो. चाइल्डस प्ले ह्या चित्रपटापेक्षा तुम्हाला झपाटलेला हा चित्रपट पाहताना जास्त गम्मत येईल येते कारण महेश कोठारे यांनी उत्तम कलाकार निवडून हा चित्रपट बनवला आहे. ह्यात कॉमेडी सोबत थरारक दृश्य पाहण्यात वेगळीच मजा येते जी लहानांपासून मोठांपर्यंत सर्वांचं हवीहवीशी वाटते.

baba chamatkar in zapatela movie
baba chamatkar in zapatela movie

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *