
मागील काही दिवसांपूर्वी लक्ष्याची मुलगी स्वानंदी बेर्डे एका फोटोमुळे चांगलीच चर्चेत आली होती. आपला जवळचा मित्र मानणाऱ्या प्रेम मोदी सोबत तिने शेअर केलेला तो फोटो आणि त्याला दिलेले कॅप्शन सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यामुळे स्वानंदी प्रेम मोदी च्या प्रेमात आहे अशीच चर्चा जोरदार रंगली होती. परंतु हे प्रकरण भलतीकडेच जात असल्याचे पाहून स्वानंदीने आपल्या इन्स्टाग्रामवरून ती पोस्ट लगेचच डिलीट केली आहे. या प्रकरणी स्वानंदीची आई अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

स्वानंदीने लिहिलेल्या त्या पोस्टमध्ये म्हटले होते की…,’तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य पाहण्यासाठी मी काहीही करू शकते. आयुष्यातील कठीण काळात आपण अधिक जवळ आलो. आता तुझी इतकी सवय झाली आहे की एकटीला भीती वाटते. खूप प्रेम…..’ प्रिया बेर्डे यांनी मीडियाशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे की, स्वानंदी आणि प्रेम मोदी हे दोघेही खूप चांगले मित्र आहेत. मोदी कुटुंब आणि आमचे कुटुंब यांच्यातही मैत्रीचे संबंध आहेत. स्वानंदीने प्रेम मोदीला त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ शुभेच्छा दिल्या होत्या. तिच्या या शुभेच्छांचा वेगळाच अर्थ लावण्यात आला. दरम्यान स्वानंदीने आपली पोस्ट वेगळ्याच अर्थाने घेतल्याने ताबडतोब डिलीट केली असल्याचे दिसून येते. या पोस्टमध्ये तीने लिहिलेला तो मेसेज मैत्रीच्या नात्याने लिहिला असल्याचे प्रिया बेर्डे यांचे म्हणणे आहे.