
सोशल मीडियाच्या माध्यमातून छोटे मोठे कलाकार आपल्या विनोदी अभिनयाने प्रसिद्धी मिळवताना दिसतात. अनेकांना त्यांचे विनोदी व्हिडीओ मनोरंजनात्मक वाटतात तर काही जण आक्षेप घेतात. अशाच माध्यमातून प्रसिद्धी मिळवलेलं एक जोडपं सध्या नेटकऱ्यांकडून होणाऱ्या ट्रोलिंगला तोंड देताना दिसत आहे. हे जोडपं आहे सोलापूर मोहोळ येथील गणेश शिंदे आणि योगिता शिंदे. योगिता शिंदे आणि गणेश शिंदे आपल्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून विविध व्हिडीओ शेअर करताना दिसतात. या व्हिडिओत त्यांच्या दोन्ही चिमुरड्या खुशी आणि शिवानी देखील त्यांना साथ देताना दिसतात.

त्यांच्या या व्हिडिओला अल्पावधीतच प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. युट्युबवरील व्हिडिओच्या माध्यमातून हे शिंदे कुटुंब आर्थिक दृष्ट्या स्थिरस्थावर होताना दिसत आहे. या पैशाचा सदुपयोग करत त्यांनी स्वतःसाठी एक टुमदार घर बांधलं आहे त्यात साजेसं फर्निचर देखील त्यांनी खरेदी केलं आहे. तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी चार चाकी वाहनाची खरेदी केली. मात्र या यशामागचा त्यांचा हा प्रवास अतिशय खडतर होता असे म्हणायला हरकत नाही. गणेश आणि योगीताचे हे यश सर्वस्वी त्यांचेच आहे. त्यांनी बनवलेले व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांना आवडलेले आहेत मात्र अशातूनच त्यांना आता गाडी खरेदी केल्यामुळे धमक्या येऊ लागल्या आहेत. गाडी घेण्यासाठी तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आले असे धमकी देणारे फोन कॉल्स आणि मेसेजेस त्यांना येऊ लागल्याने सध्या हे दाम्पत्य मोठ्या अडचणीत सापडलं आहे. याबाबत नुकताच एक व्हिडिओ त्यांनी प्रसिद्ध केला आहे. ज्यात त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. सुरुवातीला आमच्या व्हिडीओला चांगला प्रतिसाद मिळत नव्हता मात्र खुशीच्या जन्मानंतर आमचे व्हिडीओ चांगले चालायला लागले आहेत. योगीताची डिलिव्हरी झाली तेव्हा त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे लावे लागले होते. लोकांना आवाहन करत त्यांनी आर्थिक मदत मागितली होती त्यावेळी अनेकांनी त्यांच्या परिस्थितीची जाणीव ठेऊन भरघोस मदत पाठवून दिली ज्यांनी पैसे पाठवले त्यांचे या दोघांनी आभार देखील मागितले.

परंतु हे पैसे तेव्हाच उपचारासाठी खर्च झाले असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. यासरूनच काही लोकांनी त्यांना ट्रोल करण्यास सिरुवात केली आहे.लोकांना व्हिडीओ आवडू लागत असल्याने युट्युब कडुन आम्हाला पैसे मिळू लागले आहेत आम्ही पत्र्याच्या शेडमध्ये दिवस काढले आहेत आता चांगलं चाललं की लोकांना बघवत नाही असाच काहीसा प्रकार या दोघांच्याही बाबत झालेला पाहायला मिळतो आहे. योगिता आणि गणेश यांच्या व्हिडीओत कुठलाही अश्लीलपणा नसतो, आपल्या व्हिडिओतून बहुतेकदा ते विनोद निर्मितीतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतात. आतापर्यंत त्यांच्या या युट्युब चॅनलवर ६ लाखांहून अधिक सबस्क्राईबर्स मिळालेले आहेत. त्यातून त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. असे व्हिडीओ बनवून अनेकांना आर्थिक लाभ झाला आहे. या पैशाचा उपभोग स्वतःसाठी केला तर तो लोकांना का खुपतो हेच न समजणारे कोडे आहे. तूर्तास त्यांनी अशा टीका करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करणे आणि आपले ध्येय्य साध्य करणे हाच काय तो योग्य मार्ग ठरेल…