
गेल्या वर्षी घरातील काही भांडयांपासून दोन चाकी गाडी बनवल्याचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हिनेही नुकताच हा फोटो सोशल मिडियावर पाहिला. ‘तेरी लाडली मैं’ या मालिकेत हेमांगी उर्मिला ची भूमिका साकारत होती परंतु गेल्या काही दिवसांपासून मालिकेचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. त्यावर नुकताच मालिकेच्या टीमने ही मालिकाच बंद करण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला. अगदी हेमांगीला देखील याबाबत कुठलीच कल्पना नसल्याने तिने देखील अचानकपणे घेतल्या गेलेल्या या निर्णयाबाबत खंत व्यक्त केली होती.

हेमांगी सध्या आपला संपूर्ण वेळ घरातच सुरक्षित राहून घालवण्याचा प्रयत्न करत आहे अशातच मनोरंजन म्हणून सोशल मीडियावर अनेक क्रिएटिव्हिटी तिला पाहायला मिळाल्या यातील या गाडीचा फोटो तिला प्रचंड आवडला असून त्याबाबत तिने एक छानशी पोस्ट लिहिली आहे. “कित्ती छान!….संकटात पण संधी शोधणाऱ्या एका #Engineer नवऱ्याचे हे प्रताप…. भांडी घासून झाल्यावर वाळत ठेवली आहेत…” हेमांगीच्या या पोस्टवर एकाने हा माझा मित्र ” मंगेश म्हेत्रे” आहे आणि गेल्या वर्षी त्याने ही क्रिएटिव्हिटी केली असल्याचे सांगून ती क्रिएटिव्हिटी कशी तयार झाली याचाही एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून हेमांगीने बक्षीस म्हणून “पाच तांब्याच्या कळशा” देण्याची तयारी दर्शवली आहे. यावर स्वतः मंगेश म्हेत्रेने तुमचं भांडी दुकान आहे वाटत म्हणून एक मजेशीर कमेंट केली त्यावर हेमांगीने ‘ दुकान नाहीये पण बक्षीस देण्याची दानत आहे!’ असे म्हणून सगळ्यांची मने जिंकुन घेतली आहेत. कुठल्याही कलाकाराला आपल्या कलेची दखल घेतली जावी ही त्याच्या कलेसाठी एक कौतुकाची बाब ठरत असते. सोशल मीडियावर व्हायरल झालेली मंगेशची ही कला देखील त्याच्यासाठी विशेष म्हणावी लागेल त्यात भर म्हणजे आजही त्याच्या या कलेची कोणीतरी दखल घेतंय हेही नसे थोडके!…