Breaking News
Home / जरा हटके / केस कापणारा व्यक्ती कसा बनला करोडपती? पहा नक्की काय केलं ह्याने ज्यामुळे आज आहे खूपच श्रीमंत

केस कापणारा व्यक्ती कसा बनला करोडपती? पहा नक्की काय केलं ह्याने ज्यामुळे आज आहे खूपच श्रीमंत

वडिलांच्या निधनानंतर वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षीच संसाराचा गाडा चलवणारा हा व्यक्ती आहे एक सर्वसामान्य न्हावी. पण मग तुम्ही म्हणाल १०० ते १५० रुपये मिळकतीच्या जोरावर कोणी करोडपती होऊ शकतो का? तर त्याचे उत्तरही तुम्हाला हो असेच मिळेल. कारण या व्यक्तीने अशी काही युक्ती केली की ज्यामुळे आज या व्यक्तीकडे जवळपास ३७८ हुन अधिक चारचाकी गाड्या आहेत यात साधारण १२० लक्झरी गाड्यांचाही समावेश आहे. या व्यक्तीचे नाव आहे “रमेश बाबू” त्यांच्या बद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात..

ramesh babu pic
ramesh babu pic

कर्नाटकातील बंगलोर येथे रमेश बाबूंचे केस कापण्याचे दुकान आहे. १९७९ साली वडिलांच्या निधनानंतर घराची जबाबदारी रमेश बाबूवर येऊन पडली. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षीच घरोघरी दूध आणि वर्तमानपत्र जाऊन देण्याचे काम त्यांनी केले. त्यानंतर वयाच्या १८ व्या वर्षी स्वतःचे सलून चालवण्यास त्यांनी सुरुवात केली. हा व्यवसाय इतका वाढीस लागला की सकाळी ६ ते रात्री २ वाजेपर्यंत गिऱ्हाईकांची गर्दी जमू लागली. कधीकधी तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्यांना हे काम करावे लागे. व्यवसायात भरभराट होत असल्याचे पाहून एक चारचाकी वाहन घेण्याचे त्यांनी ठरवले. १९९३ साली मारुती ओम्नी ही पहिली चारचाकी गाडी त्यांनी हप्त्याने घेतली. काही दिवस सुरळीत सुरू असतानाच पुढे हप्ते भरण्यास अडचण येऊ लागली. आर्थिक चणचण वाढू लागली तेव्हा त्यांच्या काकूंनी ती गाडी भाडेतत्त्वावर देण्याचा सल्ला दिला. आपल्याला वेगळं काहीतरी करून दाखवायचं म्हणून त्यांनी काकूंच्या सल्ल्याचा विचार केला.

ramesh babus inspiring story
ramesh babus inspiring story

एक गाडी भाडेतत्त्वावर दिल्यानंतर आणखी एक गाडी खरेदी करण्याचे त्यांनी ठरवले. असे करता करता आज त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीच्या जवळपास ३७८ हुन अधिक चारचाकी गाड्या आहेत. ज्यात १२० मर्सिडीज, रोल्स रॉयल्स, जगुआर, ऑडी सारख्या लक्झरी गाड्यांचा समावेश आहे. आज रमेशबाबू एवढ्या गाड्यांचे मालक तसेच सर्वपरिचित कार रेंटल बीजनेसमन असूनही स्वतःचा सलूनचा व्यवसाय ते सांभाळत आहेत. स्वतः हातात कात्री घेऊन येणाऱ्या गिऱ्हाइकांचे ते आजही केस कापताना दिसतात. आपला मूळ व्यवसाय असाच टिकवून ठेवायचा असा त्यांचा मानस आहे. श्रीमंत झालो म्हणून आपला मूळ व्यवसाय सोडायचा हे त्यांना मुळीच पसंत नाही. या केस कापण्याचे त्यांना एका गिऱ्हाईकाकडून १५० रुपये मिळत असले तरी आपले पाय जमिनीवरच असावेत असे त्यांचे मत आहे. व्यवसाय कुठलाही असो त्याला युक्तीची जोड दिली की माणूस कुठल्याकुठे जाऊन पोहोचतो हे रमेश बाबूंकडे पाहिल्यावर समजते. प्रयत्न करा यश नक्कीच तुमचे असेल अशीच प्रचिती या उदाहरणावरून तरी देता येईल….

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *