कारभारी लयभारी मालिकेतील “शोनामॅडम” ची रिअल लाईफ स्टोरी

December 16, 2020
कारभारी लयभारी मालिकेतील “शोनामॅडम” ची रिअल लाईफ स्टोरी

कारभारी लयभारी मालिकेतील मुख्य नायक आणि नायिका अर्थात राजवीर आणि प्रियांका यांच्या प्रेमकथेतील आडकाठी म्हणजे शोना मॅडमचे पात्र. शोना, जगदीश, कांचनकाकी ही पात्र मालिकेतून एक विरोधी भूमिका दर्शवत असल्याने मालिका अधिकच खुलून आलेली पाहायला मिळते. आज शोनाचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…. शोनाची भूमिका साकारली आहे अभिनेत्री “रश्मी पाटील” हिने. रश्मी पाटील हिचे मूळ नाव आहे ‘रश्मी अशोक येसुगडे-पाटील’. रश्मी ही मूळची

rashmi patil actress
rashmi patil actress

सांगलीची असून वाडिया कॉलेजमधून तीने आर्ट्समधून शिक्षण घेतले आहे. यासोबतच ती एक इंटेरिअर डिझायनर देखील आहे. रश्मीला लहानपणापासूनच नृत्याची विशेष आवड आहे. कथ्थक, साल्सा, बेलीडन्स, भरतनाट्यम, लॅटिन अशा विविध फॉर्म मधून तिने नृत्याचे धडे गिरवले आहेत. लावणी नृत्य ही तिची विशेष आवड असून “सुपरहिट मराठी लावणी” शोमधून तीने आपल्या अदाकारीने अनेक रसिकांना घायाळ केले आहे. यासोबतच विविध चित्रपटातून आयटम सॉंगही तिने साकारले आहेत. नृत्यात निपुण असलेल्या रश्मीने सुरुवातीला मॉडेलिंग क्षेत्रातही आपला जम बसवला होता. प्राजक्ता, वचन दिले तू मला यांसारख्या मालिकेतून तीने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. एक गाव बारा भानगडी या वेबसिरीजमध्येही ती झळकली. कारभारी लयभारी मालिकेतून तिच्या अभिनयाला भरपूर वाव मिळाला आहे. तीने साकारलेली शोना मॅडम ही भूमिका विरोधी जरी असली तरी ती प्रेक्षकांच्या विशेष स्मरणात राहते. अभिनेत्री रश्मी पाटील हिला शोनाच्या भूमिकेसाठी खूप खूप शुभेच्छा..