मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री माजी नगरसेवकाच्या प्रेमात पडली. अनेकदा शूटिंगच्या ठिकाणी त्याचे जाणे येणे वाढत गेले त्यामुळे त्या अभिनेत्रीला प्रपोज करून त्याने अगदी थाटात लग्नही केले. परंतु लग्नाच्या काही महिन्यातच या अभिनेत्रीला एक फोन आला आणि जे सत्य समोर आले ते जाणून या अभिनेत्रीला धक्काच बसला. ही अभिनेत्री आहे “स्मिता गोंदकर “. स्मिता गोंदकर ही एक स्टंट रायडर म्हणूनही ओळखली जाते. झी मराठीवरील “काय घडलं त्या रात्री” या मालिकेतून सध्या ती संजनाचे पात्र साकारत आहे. याअगोदर अनेक हिंदी म्युजिक व्हिडीओ त्याचप्रमाणे काही मोजक्या मराठी चित्रपटातून तिने अभिनय साकारला आहे.

मराठी बिग बॉस च्या पहिल्या सिजनमध्ये देखील तिला पाहिले गेले. आज स्मिता गोंदकर हिच्या रिअल लाईफबद्दल जाणून ध’क्का बसेल, त्याला कारणही तसेच आहे…स्मिताची ओळख माजी नगरसेवक सिद्धार्थ बाठिया याच्यासोबत झाली होती. त्यांची ही ओळख अगदी लग्नापर्यंत येऊन ठेपली होती त्यांचे लग्नही अगदी थाटात पार पडले होते. लग्नानंतर वर्सोवा येथे ती सिद्धार्थ सोबत राहत होती. परंतु अवघ्या तीन महिन्यांनी तिला एका महिलेचा फोन आला आणि ‘मी सिद्धार्थची पत्नी आहे आणि आम्हाला दोन मुलं देखील आहेत’ अशी धक्कादायक माहिती तिने स्मिताला सांगितली. ही बाब तिने सिध्दार्थला विचारली त्यावेळी त्याने अगोदरच पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतला असल्याचे सांगितले. त्याचे पुरावे देखील त्याने आणून दाखवले त्यावर स्मिताने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. एवढेच नाही तर स्मिताचा विश्वास बसावा म्हणून त्याने स्मितासोबतच्या लग्नाचे सर्टिफिकेट बनवून आणले. यावर विश्वास बसल्याने पूर्वीप्रमाणे स्मिताने आपला संसाराचा गाडा पुन्हा सुरळीत चालवला. दरम्यान कुठल्याही फंक्शनला स्मिता आणि सिद्धार्थ एकत्रित जात त्यामुळे सर्वांनाच तिचे लग्न झाले आहे असे समजले होते.

लग्नाच्या वाढदिवशी देखील त्यांनी अनेकांना आमंत्रित केले होते. त्याचे फोटो वृत्तपत्रात देखील छापले गेले होते. यानंतर काही दिवसांनी एक महिला स्मिताच्या घरी आली त्या महिलेने ‘मी सिध्दार्थची पत्नी असल्याचे सांगितले’. तिचे सर्व बोलणे ऐकून घेतल्यावर स्मिताने घटस्फोट घेतलेल्या कागदपत्रांची चौकशी केली . ते सर्व कागदपत्र खोटे असल्याचे तिच्या निदर्शनास आले. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच सिद्धार्थ विरुद्ध तीने तक्रार नोंदवली. त्यावेळी अनेक वृत्त पत्रांमधून ही बातमी छापण्यात आली होती. ही बाब जेव्हा समोर आली त्यावेळी सिध्दार्थने स्मितासोबत लग्नच केले नसल्याचा पोलिसांसमोर बनाव केला. ‘आम्ही लग्नाचे केवळ शूटिंग करत होतो’ असे धक्कादायक वक्तव्य त्याने त्यावेळी केले होते. हे सर्व ऐकून स्मिता आणखीनच खचून गेली. मानसिक खच्चीकरण झाल्याने तिने कला क्षेत्रापासूनही काही काळ दूर राहणे पसंत केले होते. या सर्व घटनांमधून स्वतःला सावरत पुन्हा एकदा नव्याने ती कलाक्षेत्रात सक्रिय झालेली पाहायला मिळाली. मराठी बिग बॉसचा शो असो किंवा काय घडलं त्या रात्री, कॉमेडी बिमेडी अशा विविध शो आणि मालिकांच्या माध्यमातून ती प्रेक्षकांसमोर आली आहे.