पुढचं पाऊल या मालिकेतून आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांनी दोघांनी एकत्रित काम केले होते. मालिकेत काम करत असतानाच दोघांमध्ये प्रेम जुळून आले. कलर्स मराठी वरील बिग बॉसच्या शोमध्ये असताना आस्तादने स्वप्नालीसोबतच्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यावेळी स्वप्नाली तिच्या बाबांसोबत टीव्ही पाहत होती तेव्हा तिच्यासह तिच्या बाबांनाही हा आश्चर्याचा धक्का बसला. आस्ताद या शोमध्ये असताना असे काही बोलले याची पुसटशी कल्पनाही त्यावेळी तीने केली नव्हती.

मधल्या काळात या दोघांनी एकत्रित फोटोशूट केले होते त्यावेळी हे प्रिवेडिंग फोटोशूट असावे असे तर्क सोशल मीडियावर लावले जात होते. परंतु लवकरच आता आस्ताद आणि स्वप्नाली लग्न करत आहेत अगदी दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्री शिल्पा नवलकर, मेघा धाडे आणि शाल्मली तोळ्ये यांनी आस्ताद आणि स्वप्नालीचे केळवण केलेले पाहायला मिळाले. त्यामुळे या दोघांच्याही घरी लगीनघाई सुरू असून त्यांच्या लग्नाची तारीखही निश्चित केली आहे. पुढील महिन्यात म्हणजेच १४ फेब्रुवारी २०२१ रोजी व्हॅलेन्टाईन डे चे औचित्य साधून हे दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. पुण्यात अगदी साध्या पद्धतीने म्हणजेच हे दोघे रजिस्टर मॅरेज करणार असल्याची सध्या चर्चा आहे. याबाबत सविस्तर माहिती येत्या काळात अधिक स्पष्ट होईल. तुर्तास अस्ताद काळे ने मध्यंतरी माझ्याकडे काही काम नाहीये असे सोशल मीडियावर सांगितले होते त्यानंतर चंद्र आहे साक्षीला या मालिकेत तो एक महत्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. या मालिकेसाठी आस्ताद काळे ला खूप खूप शुभेच्छा…