अभिनेत्री अलका कुबल यांना गेल्या वर्षात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे मग त्यात आई माझी काळूबाई मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे झालेले निधन असो वा त्याच मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिच्याशी झालेला वाद. ह्या दोन्ही बाबी निवळतात न निवळतात तोच मानाचा मुजरा ह्या कार्यक्रमामुळे आर्थिक घोटाळ्यात त्यांचे नाव नुकतेच समोर आले आहे. त्यामुळे मागील काही दिवस माझ्यासाठी खूप वादाचे ठरले आहेत असे त्यांनी मुलाखतीतून सांगितले आहे.

यात महत्वाची बाब म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सोबत झालेला वाद हा अजूनही मिटला नसल्याचे त्यांनी या मुलाखतीत सांगितले आहे. अलका कुबल यांना वेगवेगळ्या ग्रुपकडून आजही ट्रोल केले जात आहे. प्राजक्ताने आई माझी काळूबाई मालिकेत काम केले त्याचे पेमेंट तिला मिळाले नसल्याने मला अनेकदा ध म’ कावले जात आहे असे अलका कुबल म्हणतात. परंतु जसजसे आमच्याकडे पैसे आले आहेत तसतसे आम्ही तिचे पेमेंट केले आहे. आम्ही तिला दोन महिन्यांचे पेमेंट दिले आहे आणि आता फक्त लास्ट पेमेंट बाकी आहे. तिनं काम केलं आहे तर त्याचे तिला पैसे मिळणारच आहेत. माझ्याकडून हा वाद आता संपला आहे मला यात आणखी वाद वाढवायचा नाही. तीने ही मालिका सोडली असली तरी आता वीणा जगताप आर्याची प्रमुख भूमिका बजावत आहे आणि आता तर ह्या मालिकेला चांगला टीआरपी देखील मिळत आहे. केवळ खेड्यातच नव्हे तर शहरात देखील प्रेक्षकांकडून या मालिकेला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे असेही त्यांनी मालिकेबद्दल बोलताना सांगितले.