
सोनी मराठी वाहिनीवर आई माझी काळूबाई ही मालिका प्रसारित होत आहे. सुरुवातीपासूनच मालिकेत होत असलेल्या बदलांमुळे ही मालिका आणि त्यातील कलाकार नेहमीच चर्चेत राहिली आहेत. आई माझी काळूबाई या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर काम करत असताना को” रो” ना” मुळे त्यांचे निधन झाले. त्यामुळे मालिकेच्या सर्वेसर्वा असलेल्या अलका कुबल यांना खूप मोठा धक्का बसला. त्यानंतर मालिकेत आर्याची प्रमुख भूमिका साकारत असलेल्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिनेही यापुढे मालिका करत नसल्याचा निर्णय घेतला. सेटवर इतर कलाकारांनी दिलेली गैरवर्तवणूक आणि काम करूनही पैसे मिळाले नसल्याचा आरोप तीने अलका कुबल यांच्यावर लावला होता.

हे संकट सरते न सरते तोच आता गेल्या चार ते पाच महिन्यांपासून आर्याची भूमिका साकारत असलेल्या वीणा जगताप हिने देखील मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. वीणा जगताप हिच्यानंतर या मालिकेत अभिनेत्री रश्मी अनपट खेडेकर हिची आर्याच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. त्यामुळे वारंवार होत असलेल्या नायिकांच्या बदलामुळे अलका कुबल यांच्यावर ठपका ठेवला जात आहे. मालिकेतील प्रमुख पात्र बदलण्याची ही दुसरी वेळ त्यामुळे निश्चितच मालिका आणि पर्यायाने अलका कुबल यांच्याही नावाची चर्चा पाहायला मिळते आहे. याच कारणास्तव अभिनेत्री अलका कुबल यांनी मीडियाला एक मुलाखत दिली आहे त्यात त्यांनी वीणा जगताप ने मालिका का सोडली याचा खुलासा केला आहे. अलका कुबल म्हणतात की मालिकेत काम करत असताना सतत एकच एक काम केल्यामुळे कुठेतरी कलाकाराला ते बंधन नको असते. त्या कामाचा त्यांना कंटाळा आलेला असतो. वीणा जगताप ने देखील या मालिकेत जवळपास४ ते ५ महिने काम केले आहे त्यामुळे तिलाही या कामाचा स्ट्रेस जाणवू लागला आरोग्याच्या कारणास्तव विणाने ही मालिका पुढे न करण्याचा निर्णय घेतला आहे हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे. सततच्या कामातून मोकळीक मिळावी म्हणून विणाने ही मालिका पुढे करत नसल्याचे सांगितले आहे. वीणा नंतर आता रश्मी अनपट ही मालिका साकारत आहे. निश्चितच आई माझी काळूबाई या मालिकेवर प्रेक्षकांचे प्रेम आहे त्यामुळे मालिकेचा टीआरपी देखील वरचेवर वाढत आहे. रश्मीच्या येण्याने मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे .