स्टारप्रवाह ही वाहिनी टीआरपीच्या बाबतीत अग्रस्थानी असलेली पाहायला मिळत आहे वाहिनीच्या तब्बल पाच मालिकांना प्रेक्षकांनी पुरेपूर पसंती दर्शवली असून यात आई कुठे काय करते या मालिकेचाही समावेश आहे. आई कुठे काय करते ही स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका आता खूपच रंजक होताना दिसत आहे. एकीकडे अभिला नोकरी लागल्याने अरुंधतीसह सर्वच कुटुंबाने आनंद व्यक्त केला आहे तर रजनी कारखाणीसची या मालिकेत नव्याने एन्ट्री झाल्याने मालिका अधिकच उत्कंठावर्धक झाली आहे.

गौरीची आई रजनी कंपनीची मालकीण असल्याने अनिरुद्धला आपली नोकरी टिकवण्यासाठी रजनीला कसे पटवणार ते येत्या काही भागातच पाहायला मिळेल. तूर्तास रजनी कारखानीसची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल आज काही खास गोष्टी जाणून घेऊयात… ही भूमिका साकारली आहे अभिनेत्री “सुषमा मुरुडकर” यांनी. सुषमा मुरुडकर यांनी या मालिकेअगोदर हिंदी मालिकेतून काम केले आहे. तर काही व्यावसायिक जाहिरातींमधूनही त्या झळकल्या आहेत. “इश्क में मरजावा २”,” कुंडली भाग्य ” या हिंदी मालिका तसेच ‘जागो ग्राहक जागो’ च्या जाहिरातीत देखील झळकल्या आहेत. याअगोदर एक टिकटॉक क्वीन म्हणून तिच्या व्हिडीओजना चांगलीच पसंती मिळाली होती. आई कुठे काय करते या मालिकेतून पहिल्यांदाच मराठी मालिकेत झळकण्याची संधी मिळाली असल्याने सुषमा मुरुडकर प्रकाशझोतात आल्या. रजन कारखानीसची दमदार भूमिका वाट्याला आल्याने त्या खूप खुश देखील आहेत.