अमित ठाकरे सोबत दिसणारा हा तरुण आहे मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा…आई देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

February 1, 2021
अमित ठाकरे सोबत दिसणारा हा तरुण आहे मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा…आई देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

मराठी सृष्टी आणि राजकीय मैत्रीचेसंबंध हे समीकरण कित्येकदा पाहायला, अनुभवायला मिळते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्यासोबत असलेला हा तरुण देखील मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा आहे हे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. फोटोतील हा तरुण आहे “अभिषेक गुणाजी”. अभिषेक गुणाजी हा मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा मुलगा आहे. अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटासोबतच मालिकांमधून आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली आहे. मॉडेलिंग आणि अभिनयासोबतच ट्रॅव्हल शोचे सूत्रसंचालन त्याचप्रमाणे महाबळेश्वर सारख्या पर्यटन स्थळाचे ब्रँड अंब्यासिडर म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.

milind gunaji family
milind gunaji family

प्रसिद्ध अभिनेत्री आणि सुत्रसंचालिका राणी गुणाजी या मिलिंद गुणाजीच्या पत्नी. हम बने तुम बने मालिकेतून राणी गुणाजी यांनी अभिनय साकारला आहे. “कल्पांतर” या मराठी मालिकेत एकत्रित काम करत असताना मिलिंद आणि राणी गुणाजी यांची भेट झाली होती. या भेटीचे पुढे प्रेमात आणि नंतर लग्नात रूपांतर झाले. मिलिंद गुणाजी त्यावेळी मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत होते . कल्पांतर ही त्यांनी अभिनित केलेली पहिलीच मालिका तर राणी गुणाजी नाटकांमधून सक्रिय होत्या. अभिषेक हा त्यांचा एकुलता एक मुलगा. अभिषेक गुणाजी आणि अमित ठाकरे हे दोघेही खास मित्र . या दोघांची मैत्री त्यांच्या एकत्रित फोटोंवरून तुमच्या लक्षात येईल. अभिषेकने रुईया कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. फोटोग्राफीची आवड असलेल्या अभिषेकने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. गेल्या वर्षी त्याने “छल” या शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन केले होते ज्यात सुमित राघवन आणि मिलिंद गुणाजी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय ‘आपलं कर्जत जामखेड’ या ट्रॅव्हल सिरीजचे दिग्दर्शनही त्याने केले होते.