मराठी सृष्टीतील अभिज्ञा भावे हिच्यासह मानसी नाईक आणि मिताली मयेकर नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच लग्न बंधनात अडकणार आहेत. या तिघींपैकी अभिज्ञा भावेच्या घरी गेल्या काही दिवसांपासून लग्नाची लगबग सुरू देखील झाली होती. तर मानसी नाईक हिनेही बॅचलर पार्टी साजरी केलेली पाहायला मिळाली नुकतेच मानसी नाईक हिने प्रदीप खरेरा सोबत प्रिवेडिंग फोटोशूट केले आहे. त्यामुळे तिची ही लगीनघाई पाहायला मिळत आहे तर नुकतेच अभिनेत्री अभिज्ञा भावे हिच्या घरी हळद फोडण्यापासून मेहेंदी सेरेमनी आणि त्यानंतर हळदीचा सोहळा पार पडला.


या सोहळ्याचे फोटो अभिज्ञाने सोशल मीडियावर शेअर केलेले पाहायला मिळाले होते. मागील दोन दिवस पार पडलेल्या मेहेंदि आणि हळदीच्या या सोहळ्यात श्रेया बुगडेसह अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. आज बुधवार ६ जानेवारी रोजी अभिज्ञा ही मेहुल पै सोबत विवाहबद्ध झाली असून त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिज्ञाने गुलाबी रंगांची नक्षीदार साडी तर मेहुलने त्याच रंगाचा शेरवानी परिधान केला आहे. दोघांनी परिधान केलेल्या लग्न सोहळ्यातील या वेशात हे नवदाम्पत्य अधिकच खुलून दिसत आहे. आज दुपारी त्यांच्या लग्नाचा हा सोहळा मोठ्या थाटात पार पडला असून अनेक मित्रमंडळी तसेच नातेवाईक आमंत्रित करण्यात आले होते. यासोबतच त्यांच्या लग्नाच्या सोहळ्यात रेश्मा शिंदे, तेजस्विनी पंडित, श्रेया बुगडे यांच्यासह अनेक मराठी सेलिब्रिटिंनी हजेरी लावलेली पाहायला मिळते आहे. अभिज्ञा आणि मेहुलला त्यांच्या आयुष्याच्या या नव्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…