अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि मेहुल पै यांचे नववर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच ६ जानेवारी २०२१ रोजी मुंबई येथील अथेना बँकवेट या ठिकाणी मोठ्या थाटात लग्न पार पडले होते. त्यांच्या या लग्नसोहळ्याला बऱ्याच सेलिब्रिटिंनी हजेरी लावून शुभाशीर्वाद दिले होते. ग्न विधीसाठी परंपरेचे पावित्र्य अधोरेखित करत अभिनेत्री अभिज्ञा भावेने तष्ट हाऊसने डिझाईन केलेली कमळाचे नक्षीकाम असलेली भरजरी हँडवर्क सिल्क साडी परिधान केली होती. तिच्या या साडीचे सोशल मीडियावर खूप कौतुकही झाले. मेहुलने देखील अभिज्ञाला साजेसा असा पेहराव केलेला पाहायला मिळाला होता.

लग्नानंतर अभिज्ञा तिच्या हटके मंगळसूत्रामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मंगळसूत्र हा महिला वर्गात एक कुतूहलाचा विषय मानला जातो. यात बॉलिवूड अभिनेत्रिंच्या मंगळसूत्राचीही अनेकदा चर्चा रंगलेली पाहायला मिळते. मग यात मराठी अभिनेत्री देखील कशा मागे राहतील. आपल्या रोजच्या वापरातील मंगळसूत्र आकर्षक आणि त्यात काहीतरी खास असावे अशी ईच्छा अनेक जणींची असते. त्याचमुळे अभिज्ञाचे हे मंगळसूत्र चर्चेत येत आहे एका व्हिडिओच्या माध्यमातून तिच्या या खास डिझाइन केलेल्या मंगळसूत्राने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतलेले पाहायला मिळत आहे. तिच्या या रोजच्या वापरातील छोट्या मंगळसूत्राच्या पेंडंट मध्ये अभिज्ञा आणि मेहुल या दोघांच्या नावाची आद्याक्षरे म्हणजेच M आणि A डिझाइन केलेली पाहायला मिळत आहेत. या दोन्ही अक्षरांच्या मधोमध बदाम आणि कडेला दोन काळे मणी असल्याने तिचे हे हटके मंगळसूत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.