अग्गबाई सासूबाई या मालिकेत मॅडीची भूमिका साकारली होती अभिनेत्री “भक्ती रत्नपारखी” हिने. मालिकेतील मॅडीचा मॅडनेसपणा प्रेक्षकांना खूपच भावला होता त्यामुळे ह्या पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलेले पाहायला मिळाले. अग्गबाई सासूबाई या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे त्यामुळे या मालिकेचाच सिकवल असलेली “अग्गबाई सुनबाई” ही नवी मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेचा सिकवल जरी असला तरी या मालिकेतून मोठे बदल करण्यात येत आहेत.

शुभ्रा आणि बबड्याची पात्र आता उमा पेंढारकर आणि अद्वैत दादरकर साकारणार आहेत त्यामुळे मालिकेत या पात्रांबद्दल कमालीची उत्सुकता पाहायला मिळते आहे. तर तिकडे भक्ती रत्नपारखी हिने साकारलेल्या मॅडीला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली, आपल्या कामाचे कौतुक केले त्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. शिवाय भावनिक होऊन तिने मालिकेच्या संपुर्ण टीमचे आभार मानणारी एक पोस्ट शेअर केली आहे. अग्गबाई सासूबाई मालिकेतील मॅडीचा मॅडपणा आता संपला असला तरी तिने लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अग्गबाई सूनबाई या मालिकेतून पुन्हा एकदा मॅडीचा प्रवास पाहायला मिळणार आहे…यात थोडीशी वेगळी मॅडी तुम्हाला बघायला मिळेल…तिच्यावरही असच प्रेम करा” असे तिने सुचवले असल्याने ही नवी मॅडी नेमकी कोण आहे ? असा प्रश्न उपस्थित होतो. मालिका पाहिल्यावर लवकरच या प्रश्नाचे उत्तरही स्पष्ट होईल पण तुर्तास भक्ती रत्नपारखी हिने साकारलेल्या मॅडिला खरोखरच तोड नव्हती हे तिच्या अभिनयातून जाणवले. या नव्या मालिकेत भक्तीला पुन्हा एकदा मॅडीच्या भूमिकेत पाहायला प्रेक्षकांना नक्की आवडेल…