झी मराठी वरील अग्गबाई सुनबाई या मालिकेला गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांकडून म्हणावा तसा चांगला प्रतिसाद मिळत नाहीये. तर अव्दैत दादरकरच्या येण्याने ही मालिका म्हणजे अगदी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचाच सिकवल आहे की काय अशाच प्रतिक्रिया बऱ्याचदा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षक व्यक्त होताना दिसत आहेत. त्यामुळे दमदार कलाकार आणि तितकाच तगडा अभिनय असूनही या मालिकेचा टीआरपी पुरता खाली आलेला पाहायला मिळत आहे. याच अनुषंगाने मालिकेत एक मोठा बदल घडून आणला जात आहे. हा बदल लवकरच मालिकेच्या पुढील भागातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.

मालिकेत लवकरच एका प्रसिद्ध कलाकाराची एन्ट्री होत आहे त्यामुळे या मालिकेच्या कथानकाला एक मोठा ट्विस्ट आलेला दिसणार आहे. लवकरच अभिनेता “चिन्मय उदगिरकर” मालिकेत एक महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘अनुराग गोखले’ हे त्याच्या कॅरॅक्टरचे नाव असून त्याच्या येण्याने शुभ्राच्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळणार असल्याचे समजते. नुकतेच लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच शुभ्राला सोहम आणि सुझान यांच्यातील प्रेमसंबंधाचा उलगडा होत असतो यामुळे शुभ्रा अधिकच खचून गेलेली दिसली. तिला सावरण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न हा अनुराग गोखले करणार आहे त्यामुळे मालिकेचे पुढील भाग आता रंजक होताना दिसणार आहेत. येत्या काळात शुभ्रा अनुरागच्या मदतीने सोहमला धडा शिकवणार का हे ही पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. अनुरागच्या येण्याने आता मालिकेचा घसरलेला टीआरपी निश्चित वाढेल अशी आशा आहे.