अग्गबाई सुनबाई मालिकेतील बालकलाकार “बबडू” नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या

March 18, 2021
अग्गबाई सुनबाई मालिकेतील बालकलाकार “बबडू” नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या

अग्गबाई सासूबाई या मालिकेच्या लोकप्रियतेनंतर झी मराठी वाहिनीने याच मालिकेचा सिकवल असलेली “अग्गबाई सुनबाई” ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. मालिकेत आसावरी, अभिजित राजे, आजोबा, शुभ्रा, सोहम ही पात्रे पाहायला मिळत असली तरी शुभ्रा आणि सोहमची भूमिका आता अभिनेत्री उमा पेंढारकर आणि अभिनेता अव्दैत दादरकर निभावताना दिसत आहेत. या मालिकेत नव्याने बबडू नावाच्या एका चिमुरड्या पात्राची एन्ट्री झाली आहे. मुळात बबडूचे पात्र मालिकेच्या मुख्य कथानकाशी जोडली गेली असल्याने ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. अग्गबाई सासूबाई ही मालिका सोहमच्या कटकरस्थानाभोवती गुरफटली होती त्याचप्रमाणे अग्गबाई सुनबाई या मालिकेचे कथा देखील या चिमुरड्याभोवती फिरते आहे. लाडात वाढलेलं, मनाला हवं ते करणार, आणि सतत आईला त्रास देणारं हे पात्र असल्याने ह्या बबडूला सुधारण्याची जबाबदारी आसावरीकडे आलेली आहे. आज बबडूचे हे भन्नाट पात्र साकारणाऱ्या चिमुरड्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

anvit hardikar actor
anvit hardikar actor

मालिकेत शुभ्रा आणि सोहमच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या या बालकलाकाराचे नाव आहे “अन्वीत हर्डीकर”. अन्वीत ६ वर्षाचा असून सध्या तो पहिली इयत्तेत शिकत आहे. अन्वीतच्या आईचे नाव ऐश्वर्या तर वडिलांचे नाव अनिकेत हर्डीकर आहे. अनिकेत हर्डीकर हे पुण्यात फिटनेस तज्ञ म्हणून ओळखले जातात. अन्वीतला लहानपणासुनच अभिनयाची आवड आहे अगदी बालवयात असताना त्याने खाऊवाले पाटणकर जाहिरातीत काम केले आहे. याशिवाय अनेक नाट्यस्पर्धांमधून त्याने अनेक बक्षीसही मिळवली आहेत. दुर्गा प्रेरणा राज्यस्तरीय ऑनलाइन कविता स्पर्धा, दिवाकर स्मृती नाट्यछटा. सांस्कृतिक फाउंडेशन लांजा रत्नागिरी ऑनलाइन विनोदी नाट्यछटा स्पर्धा, आयटीटी चिल्डरणस गॉट टॅलेंट, नॅशनल स्टोरी टेलिंग कोंटेस्ट अशा विविध स्पर्धांमधून सहभाग घेऊन त्यांने प्रथम, द्वितीय अशी पारितोषिक पटकावली आहेत. एकपात्री नाटक “राजा शहाणा झाला” या नाटकातून त्याने तब्बल ५ वेगवेगळ्या भूमिका आपल्या अभिनयाने चांगल्याच रंगवल्या होत्या याशिवाय प्रा. देवदत्त पाठक यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या “माझ्याशी पंगा” या गुरुकुल फाउंडेशनच्या बालनाट्याचे ऑनलाइन १०० प्रयोग पार पडले यात अन्वीत नेही उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला होता. नाटक जाहिराती अशा विविध माध्यमातून हा बालकलाकार नेहमीच झळकत राहिला अग्गबाई सुनबाई ही अन्वीतने अभिनित केलेली पहिली वहिली टीव्ही मालिका यातून तो उनाड आणि हट्टी असलेल्या बबडूची भूमिका बजावत आहे. या भूमिकेसाठी अन्वीतला खूप खूप शुभेच्छा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *