जरा हटके

अग्गबाई सासूबाई मालिकेत आजोबांची एन्ट्री…हे प्रसिद्ध अभिनेते साकारणार भूमिका

अग्गबाई सासूबाई मालिका एका नव्या वळणार येऊन ठेपली आहे. बाबड्या आईच्या विरहाने आपल्या आजवर केलेल्या चुकांची कबुली शुभ्राजवळ बोलून दाखवतो. त्यामुळे बाबड्या आता सुधारत चाललाय अशी आशा शुभ्राला वाटत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला बबड्याच्या आजवरच्या वागण्यावरून तो खरंच सुधारेल का? अशी भीतीदेखील शुभ्राला वाटत आहे. बबड्या सुधारेल तेव्हा सुधारेल पण सध्या मालिकेत या बबड्याला ‘कोंबडीच्या’ म्हणायला आजोबांची एन्ट्री होणार आहे. ह्या आजोबांची पाठमोरी झलक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे त्यामुळे ही भूमिका कोण साकारत आहे याबाबत विविध तर्क लावले जातात आहेत….

aggabai sasubai serial
aggabai sasubai serial

मालिकेत नव्याने दाखल होणारे आजोबा प्रसिद्ध अभिनेते “मोहन जोशी ” साकारणार असल्याची चर्चा रंगली आहे. कारण प्रोमोत पाठमोरे दिसणारे हे आजोबा मोहन जोशी यांच्या प्रमाणेच दिसत आहेत असे अनेकांनी मत व्यक्त केले आहे. मोहन जोशी याअगोदर जीव झाला येडा पिसा मालिकेत यशवंतरावांची भूमिका साकारत होते मधल्या काळात त्यांचे पात्र बदलले गेले परंतु दोन महिन्यांपूर्वी पुन्हा नव्याने ते या मालिकेतून सक्रिय झाले. अग्गबाई सासूबाई मालिकेतील आजोबा अर्थात दत्तात्रय कुलकर्णीची भूमिका रवी पटवर्धन यांनी आपल्या दमदार अभिनयाने चांगलीच वठवली होती परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मालिकेत पाहता आले नाही त्यानंतर त्यांच्या निधनाच्या बातमीने केवळ बबड्याचे आजोबा म्हणून नाही तर त्यांच्या अवघ्या चाहत्यांचेच आजोबा आपल्याला सोडून गेले अशी भावना प्रत्येकाने व्यक्त केली. त्यांनी वठवलेल्या आजोबांच्या भूमिकेला योग्य न्याय मिळावा यासाठी तितक्याच ताकदीच्या अभिनेत्याची नियुक्ती करणे आवश्यक आहे मोहन जोशी या भूमिकेला योग्य न्याय देतील अशी आशा प्रेक्षकांना वाटत असल्याने पाठमोरे आजोबा तेच असावेत असे सगळ्यांना वाटत आहे. येत्या काही दिवसातच ही भूमिका नेमकी कोण साकारत आहे ते लवकरच स्पष्ट होईल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button