अग्गबाई सासूबाई मालिकेतील जेष्ठ कलाकार रवी पटवर्धन यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अग्गबाई सासूबाई मालिका करताना सेटवरही ते क्वचितच दिसायचे. पण त्यांनी मालिकेत केलेलं काम प्रेक्षक कधीही विसरणार नाहीत हेही तितकंच खरं. अग्गबाई सासूबाई मालिकेतील आजोबा म्हणजेच दत्तात्रय कुलकर्णी यांची भूमिका साकारली आहे ज्येष्ठ अभिनेते “रवी पटवर्धन” यांनी. आज रवी पटवर्धन वयाच्या ८४ व्या वर्षी देखील तितकेच उत्स्फूर्त असलेले पाहायला मिळाले होते. ब्लॅक अँड व्हाइट चित्रपटाच्या जमान्यात त्यांनी अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. वयाच्या ८० व्या वर्षी भगवतगीतेचे ७०० श्लोक पाठ करून त्यांनी शृंगेरी मठाच्या परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला आहे. आपल्या कारकिर्दीत बहुतांशी पाटील, सावकार, वकील अशा विविध धाटणीच्या भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या. “आमची माती आमची माणसं” हा शेतकऱ्यांसाठी असलेला गप्पागोष्टीचा कार्यक्रम त्यांच्या “वस्ताद पाटील” भूमिकेमुळे चांगलाच गाजला होता.

त्यादम्यानही भल्या पहाटे उठून ते मॉर्निंग वॉकला आवर्जून जात. मधल्या काळात रिझर्व्ह बँकेत नोकरी केली त्यादरम्यान बँकेतील त्यांच्या सहकाऱ्यांनी नाटकात काम करता यावे म्हणून मोलाची साथ दिली. आता ते आपली पत्नी नीता सोबत ठाण्यात वास्तव्यास आहेत. अग्गबाई सासूबाई मालिकेचे शूटिंग देखील ठाण्यालाच असल्याने त्यांना मालिकेत काम करणे थोडे सोपे झाले होते. यासोबतच अवघ्या तेरा भागांची ‘तेरा पन्ने’ ही मालिका त्यांनी गाजवली होती यात हेमा मालिनी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाली होती. उंबरठा, बिन कामाचा नवरा, शेजारी शेजारी, अशा असाव्या सुना, तक्षक, तेजाब, नरसिंह, प्रतिघात, राजू बन गया जेंटलमेन, चमत्कार, युगपुरुष असे अनेक हिंदी मराठी चित्रपट त्यांनी साकारले. रवी पटवर्धन यांनी आई आपल्या वयाच्या नव्वदीपर्यंत अगदी ठणठणीत होत्या. नऊवारी नेसून बुलेटवर बसणे, घोडेस्वारी करणे हेच गुण हेरून रवी पटवर्धन आजही ठणठणीत राहण्यासाठी पहाटे चालण्याचा व्यायाम करत. अगदी अलीकडेच ” शिवपुत्र सह्याद्री ” या नाटकाच्या निमित्ताने मराठवाड्यात दौरे झाले ज्यात डॉ अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराज तर रवी पटवर्धन यांनी औरंगजेब साकारला होता.