असे अनेक जुने कलाकार आहेत ज्यांना आजही आपण जुन्या चित्रपट आणि गाण्यांत पाहतो. पण मनात असा प्रश्न नक्कीच निर्माण होतो कि हे जुने कलाकार आज सध्या काय करत असतील? मराठी चित्रपट सृष्टीत असे बरेचसे कलाकार आहेत जे एक दोन चित्रपट करूनही प्रेक्षकांच्या स्मरणात राहिले आहेत. आज अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊयात ज्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत येऊन काही मोजकेच चित्रपट आपल्या पदरात पाडून घेतले.’ गुपचूप गुपचूप’ हा चित्रपट १९८३ साली प्रदर्शित झाला होता. अशोक सराफ, श्रीराम लागू, रंजना, महेश कोठारे, कुलदीप पवार, शुभांगी रावते , पद्मा चव्हाण अशी भली मोठी स्टार कास्ट या चित्रपटाला लाभली होती.

चित्रपटात शुभांगी रावते या अभिनेत्रीने रंजनाची बहीण ‘श्यामा’ची भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी ह्या अभिनेत्रीने खूप वर्षानंतर झी मराठी सोहळ्यात तसेच झी वाहिनीच्या काही मालिकांच्या सेटवर हजेरी लावली. अनेक जुन्या कलाकारांनी तिच्याशी मनमुराद गप्पा देखील मारल्या पण नवोदित कलाकारांना ह्या नक्की आहेत तरी कोण असा प्रश्न पडला पण जाणत्या कलाकारांनी त्यांना पाहत्याक्षणी ओळखलं. आज या विस्मृतीत गेलेल्या पण तरीही आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात छाप पाडणाऱ्या अभिनेत्री शुभांगी रावते यांच्याबद्दल जाणून घेऊयात… गुपचूप गुपचूप चित्रपटातून शुभांगी रावते यांनी महेश कोठारे यांच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. ह्या चित्रपटाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आणि रातोरात चित्रपटातील कलाकार देखील सुपरस्टार बनले. चित्रपटात अनेक जुने कलाकार असले तरी नवोदित कलाकारांनी देखील उत्तम अभिनय साकारला. त्यानंतर १९८८ सालच्या ‘मामला पोरींचा’ या चित्रपटातून त्यांना महत्वाची भूमिका मिळाली.या चित्रपटात निवेदिता सराफ देखील महत्वाच्या भूमिकेत झळकल्या होत्या. इथेच निवेदिता सराफ यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री देखील झाली. मराठीतील काही मोजके चित्रपट साकारून त्यांनी हिंदीतील “वो छोकरी” चित्रपटात एका शिक्षिकेची भूमिका बजावली.

पल्लवी जोशी यांनी या चित्रपटात प्रमुख नायिका साकारली होती. अशा काही मोजक्या चित्रपटातून एक्झिट घेऊन शुभांगी रावते या आपल्या घर संसारात रमलेल्या पाहायला मिळाल्या लग्नानंतर शुभांगी रावते- म्हात्रे या नावाने त्या ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांना आदित्य म्हात्रे नावाचा एक मुलगाही आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपली खास मैत्रीण निवेदिता सराफ यांची अग्गबाई सासूबाई या मालिकेच्या सेटवर येऊन भेट घेतली होती. ज्यावेळी त्यांचे फोटो सोशिअल मीडियावर व्हायरल झाले तेंव्हा हि अभिनेत्री ना=ककी आहे तरी कोण असा सवाल अनेकांनी विचारला होता. त्यानंतर झी अवॉर्ड सोहळ्यात देखील इतर कलाकारांसोबत त्यांनी हजेरी लावली होती. आज विस्मृतीत गेलेल्या अभिनेत्री शुभांगी रावते यांनी मराठी सृष्टीत एखाद्या मालिकेतून किंवा चित्रपटातून पुनःपदार्पण केल्यास प्रेक्षकांना ते निश्चितच आवडेल यात तिळमात्र शंका नाही. शुभांगी रावते ह्यांना आमच्या संपूर्ण टीम कडून खूप खूप शुभेच्छा मराठी चित्रपट रसिक तुम्हाला आणि तुमच्या अभिनयाला आजही ओळखून आहे. शुभांगी रावते ह्यांनी केलेले त्यावेळचे चित्रपटातील काम लोक आजही आवडीने पाहतात.