मृणाल दुसानिस सध्या राहतेय अमेरिकेत तिचे तेथील फोटो नक्की पहा

मृणाल दुसानिस हिचा जन्म २० जून १९८८ साली नाशिक येथे झाला. तिने नाशिकमधील मराठा हाय स्कूल आणि गोखले एजुकेशन सोसायटीच्या H.P.T Arts and R.Y.K Science कॉलेज मधून पत्रकारिका आणि जनसंचार यात उच्च शिक्षण घेतलं. तिनं एकता कपूरच्या पहिल्या-वहिल्या मराठी मालिकेतून पदार्पण केलं, त्या मालिकेचं नाव होत “माझिया प्रियेला प्रीत कळेना”. त्यानंतर तिने चिन्मय मांडलेकरच्या “तू तिथे मी” ह्या पारिवारिक मालिकेत काम केलं. झी मराठीवरच्या “एका पेक्षा एक अप्सरा आली” ह्या रिऍलिटी डान्स शो मधेही भाग घेतला. त्यातून तीने ती एक उत्कृष्ठ डान्सर हि आहे हे दाखवून दिल. रिमोट माझा आणि आम्ही सारे खव्वये मध्ये तिने अँकरिंग हि केलं. तिनं श्रीमंत दामोदर पंत या चित्रपटातही काम केलय.

सध्या कलर्स मराठी वर तिची “अस्सं सासर सुरेख बाई” हि मालिका सुरु होती. थोड्याच दिवसांपूर्वी तिने मालिका सोडली. त्याचे कारण असे कि, गेल्या वर्षी (25th Feb 2016) तीच नीरज मोरे यांच्याशी लग्न झालं. सध्या ते अमेरिकेत एका सॉफ्टवेअर कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करताहेत. बऱ्याच दिवसांपासून ते एकमेकांना वेळ देऊ शकत नसल्यामुळे आणि नीराजच्या आई वडिलांच्या (सासू-सासरे) आग्रहाखातर मृणालने अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेतून निरोप घेऊन तिच्या पतीसोबत अमेरिकेला राहण्याचा निर्णय घेतला. आता मालिकेत जुई म्हणजेच मृणाल दुसानिसच्या जागी सायली पाटील दिसतेय. ती पुन्हा लवकरच भारतात परत येऊन मालिकांमध्ये काम करायला सुरवात करेल अशी आशा आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *