# MeToo साजिद खानने ह्या अभिनेत्रीला विचारलं “१०० करोड दिये जाये तो तुम कुत्ते के साथ सेक्स करोगी?

साजिद खान # MeToo च्या वादात चांगलाच अडकलेला पाहायला मिळतोय. नुकताच त्याने ट्विट करून # MeToo मुले माझं करिअर खराब झाल्याचं सांगितलं आहे. बोलीवुडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीं एकापाठोपाठ एक साजिद खान यांच्या विरुद्ध आवाज उठवताना पाहायला मिळताहेत. सुपरस्टार दिया मिर्झा, मॉडेल प्रियंका बोस, अभिनेत्री सलोनी चोप्रा यांच्या बरोबर आता आणखीन एका अभिनेत्रीने आपल्या सोशिअल मीडियावर साजिद खान यांच्या घाणेरड्या वागणुकी बद्दल लिहलं आहे.

लिपस्टिक अंडर माय बुर्का ची प्रसिद्ध अभिनेत्री “अहना कुमरा” हिने नुकतच सोशिअल मीडियावर साजिद खान माझ्यासोबत कसा वागला हे लिहलं आहे. ती म्हणते साजिदने मला एकदा त्याच्या घरी बोलावले होते. त्यावेळी त्याच्या घरी त्याच्या आई सोबत आणखीन काही लोक होते. तो मला काहीतरी सिक्रेट सांगायचं म्हणून एका खोलीत घेऊन गेला. खोलीत जाताच तो काही वेगळाच दिसत होता. तो मला म्हणाला “आगर तुम्हे १०० करोड दिये जाये तो तुम कुत्ते के साथ सेक्स करोगी?” ह्या प्रश्नावर मी घाबरले. मी घाबरलेले पाहून तो लगेच हसू लागला म्हणाला तुला मी केलेल्या विनोदावर हसता यायला पाहिजे. मी कशीबशी तेथून निघाले. थोड्या वेळात साजिदचा पुन्हा एक म्यासेज आला त्यात त्याने लिहले कि तू बिकिनीमध्ये खूप सुंदर दिसते.

साजिद खान वर # MeToo मोहिमेअंतर्गत बऱ्याच अभिनेत्रीनि घातलेल्या घटना सांगितल्या त्यामुळे हाउसफुल्ल ४ चित्रपट हातचा गेला. साजिद खान हाउसफुल्ल ४ चे दिग्दर्शन करणार होता. त्यानेही सोशल मीडियावर मी निर्दोष आहे असं सांगितलं होत. पण एकापाठोपाठ अभिनेत्रींनी लागवलेल्या आरोपांमुळे तो चांगलाच अडचणीत आलाय.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *