Just Married! अभिनेत्री श्रिया सरनने रशियन प्रियकर अँड्री कोसचीवशी काल केलं लग्न

श्रिया सरन ही एक भारतीय अभिनेत्री आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्हीडिओ अल्बम्स तसेच जाहिरातीतून तिने आपल्या चित्रपट कारकिर्दीचा आरंभ केला. दक्षिण भारतातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून श्रिया सरन प्रसिद्ध आहे. तेलुगू चित्रपटांपासून सुरुवात करणारी श्रिया सरन तमिळ चित्रपटातील एक मोठी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहेच त्याशिवाय ती हिंदी भाषा चित्रपटांत देखिल काम करत आहे. शिवाजी द बॉस हा तिचा एक गाजलेला यशस्वी (तमिळ) चित्रपट आहे.

श्रिया सरन ही पुष्पेंद्र सरन आणि नीरजा सरन ह्यांची मुलगी असून तिचा जन्म डेहराडून मध्ये झाला. त्यानंतर तिचे बालपण हरिद्वार पासुन काही मैलांवर असणार्या राणीपूर येथे गेले. तीचे वडील भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमीटेड (भेल) मध्ये कामाला असून आई शाळेत रसायनशास्त्राची शिक्षिका आहे,

तसेच तिला एक मोठा भाऊ ज्याचे नाव अभिरूप हे आहे. श्रियाचे शिक्षण दिल्ली पब्लीक स्कूल, हरिद्वार येथून पूर्ण झाले. तीचे महाविद्यालयीन शिक्षण लेडी श्रीराम कॉलेज,दिल्ली मधून झाले व ती बी.ए. पर्यंत शिकलेली आहे.

श्रिया सरनने प्रियकर अँड्री कोसचीवशी लग्नगाठ बांधली आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये सुपरहिट ठरलेल्या श्रिया रशियन प्रियकर अँड्रीसोबत विवाहबद्ध झाली. यापूर्वीही अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनी परदेशी लोकांसोबत लग्नाची गाठ बांधलेली आहे. गेली कित्तेक दिवस श्रिया सरन आणि अँड्री कोस यांचं अफफैर चालू होत दोघांचे बरेचसे एकत्रित फोटो सोशिअल मेडीयावर व्हायरल हि होत होते.

अँड्री हा रशियातील एक प्रसिद्ध व्यावसायिक आहे. डोमावकुस्नी या प्रसिद्ध रेस्तराँचा तो संस्थापक आहे. या रेस्तराँच्या अनेक शाखाही आहेत. याशिवाय अँड्री राष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटूही आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *