three ideots

२००९ साली प्रदर्शित झालेला “3 इडियट्स” हा बॉलिवूड चित्रपट खूपच लोकप्रिय झाला होता. शरमन जोशीने या चित्रपटात राजुची भूमिका साकारली होती. तर राजुच्या आईची भूमिका साकारली होती “अमरदीप झा ” या अभिनेत्रीने. अमरदीप झा यांचे लग्न झाल्यावर काही वर्षातच त्यांच्या पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर आपल्या एकुलत्या एक मुलीच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्यावरच येऊन पडली. आज आपण अमरदीप झा या अभिनेत्रीबद्दल अधिक जाणून घेऊयात…

amardeep jhal with daughter
amardeep jhal with daughter

अमरदिप झा यांचा जन्म पटना बिहारचा. १९९७ साली छोट्या पडद्यावरील ‘अमानत’ या हिंदी मालिकेत प्रथमच त्यांना झळकन्याची संधी मिळाली. त्यानंतर ‘दुष्मन’ हा बॉलिवूड चित्रपट त्यांनी साकारला. सत्ता, लज्जा, जख्म,3 इडियट्स, ऐतबार, मर्डर 2, पिके अशा गाजलेल्या चित्रपटात त्यांना छोट्या मोठ्या भूमिका मिळत गेल्या. त्यातील त्यांनी साकारलेली 3 इडियट्स मधील राजुची आई आपल्या गरिब परिस्थितीमुळे चांगलीच प्रकाशझोतात आलेली पाहायला मिळाली. पुढे ईश्क का रंग सफेद, अमृत मंथन, सिंदूर तेरे नाम का, ये रिश्ता क्या केहलाता है, कुछ तो लोग कहेंगे या गाजलेल्या हिंदी टीव्ही मालिकेतून त्यांना महत्वाच्या भूमिका मिळत गेल्या. पतीच्या निधनानंतर अमरदिप यांनी आपल्या मुलीच्या पालनपोषणाची जबाबदारी चोख बजावली. “श्रिया झा” ही त्यांची मुलगी चित्रपट अभिनेत्री तसेच हिंदी मालिका अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.तेलगू ओडिया आणि बंगाली अशा वेगवेगळ्या भाषिक चित्रपटातून श्रियाने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर उतरण, दो दिल बंधे एक डोरी से, झिल मिल सितारों का आंगण होगा, निमकी विधायक, इशारो इशारों में या हिंदी मालिकांमधून कधी प्रमुख नायिका तर कधी सहाय्यक अभिनेत्री म्हणून तीने आपल्या भूमिका बजावल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *