३ इडिस्ट्स फेम ‘चतुर रामलिंगम’ यांच्या खऱ्या लाईफ पार्टनर बद्दल जाणून घ्या

२००९ साली सुपर हिट ठरलेला चित्रपटात ३ इडियट्स मध्ये “चतुरची” भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे ओमी वैद्य. आमिर खान, आर माधवन आणि शरमन जोशी इतकाच हा अभिनेताही आपल्या अभिनय कौशल्याने चर्चेत राहिला. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेला स्क्रीन अवॉर्ड, आयफा अवॉर्ड आणि लायन्स गोल्ड अवॉर्डने सन्मानित केले.

ओमी वैद्यचा जन्म १० जानेवारी १९८२ साली यु. एस. मधील युक्त व्हॅली ,कॅलिफोर्निया येथे झाला . त्याने कॅलिफोर्निया तसेच न्यू यॉर्क युनिव्हर्सिटी तुन पदवीचे शिक्षण घेतले आहे. केवळ६ वर्षाचा असताना मराठी मंडळ नाटकात सहभाग दर्शवला. त्यानंतर अभिनय क्षेत्रात करिअर घडवून आणण्यासाठी त्याविषयीचे प्रशिक्षणही घेतले. तो मूळचा गोव्यातील असल्याने गोवा तसेच मुंबईला तो नेहमी भेट देत असत. त्याने यूएस येथील अनेक टीव्ही सीरिअल्स मध्ये छोट्यामोठ्या भूमिका साकारल्या. यूएस येथे असताना बोन्स, द ऑफिस, रोलिंग यांत भूमिका साकारल्या .

३ इडियट्स सुपरहिट ठरल्यानंतर त्याने मधुर भांडारकरचे दिगदर्शन असलेल्या ‘ दिल तो बच्चा है जी ‘ या चित्रपटात अभिनेता अजय देवगण,इमरान हाश्मी ,श्रुती हसन ही स्टार कास्ट असलेल्या चित्रपटात झळकला. यात त्याने मिलिंद केळकर ही व्यक्तिरेखा साकारली. जोडी ब्रेकर्स, मिरर गेम यातही छोट्यामोठ्या भूमिका साकारल्या. अभिनय देव यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘ ब्लॅकमेल ‘ ड्रामामध्ये त्याने बॉस डी के ची भूमिका निभावली आहे.

अभिनयासोबतच त्याने दिग्दर्शक, फिल्म एडिटर तसेच लेखकाची भूमिका बजावली आहे. आउट ऑफ द टाइम, द डेजर्ट रोज आशा काही चित्रपटाचे दिग्दर्शन केले. तर ब्लड शेड, द गोल्ड ब्रेसलेट, कोल्ड केबिन यांचे एडिटिंगही केले आहे.


२२ ऑगस्ट २००९ साली त्याने मीनल पटेल सोबत लग्न केले. मीनल पटेल ह्या डॉक्टर आहेत. (Ph.D., M.P.H.) नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (एनसीआय) येथे कॅन्सर कंट्रोल अँड पॉप्युलेशन सायन्सेसच्या डिव्हिजन ऑफ डिझिवरीटी ऑफ बिहेवियरल रिसर्च प्रोग्राम (बीआरपी) अंतर्गत मिनरल पटेल, पीएडी, एम.पी.एच. हे कर्करोग निरोधक डॉक्टर आहेत. मीनल पटेल आणि ओमी या दोघांना ३ वर्षाचा एक मुलगाही आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *