bollywood actress with bachan

बॉलिवूड सृष्टीत टिकून राहणे हे खरं तर त्या कलाकारासाठी एक मोठे आव्हानच असते. असे बरेचसे कलाकार आहेत ज्यांनी आपल्या करिअरचा सुरुवातीचा काळ खूप गाजवला पण नंतर मात्र काही कारणास्तव त्यांना नाईलाजाने का होईना या सृष्टीतून काढता पाय घ्यावा लागला. याच यादीत मराठमोळी अभिनेत्री “किमी काटकर” हिचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. किमी काटकर ही अभिनेत्री ‘टिना काटकर’ यांची मुलगी. टिना काटकर या बॉलिवूड अभिनेत्री तसेच कॉस्टयूम डिझायनर म्हणूनही ओळखल्या जात.

hum film actress
hum film actress

६० आणि ७० च्या दशकातील वल्लाह क्या बात है, जवानी दिवाणी, चंगेज खान यासारख्या चित्रपटात टिना काटकर यांनी सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत किमी काटकर हिने देखील अभिनय क्षेत्रात एन्ट्री घेतली. १९८५ सालच्या “पत्थर दिल” चित्रपटातून किमीचे बॉलिवूड सृष्टीत पदार्पण झाले. त्यानंतर प्रमुख नायिका म्हणून हेमंत बिर्जे सोबत ‘ऍडव्हेंचर्स ऑफ टार्झन’ हा चित्रपट साकारला. एक आगळे वेगळे कथानक आणि किमीच्या बोल्ड सिनमुळे हा चित्रपट तुफान हिट ठरला. यानंतर किमीला अनेक चित्रपटांची ऑफर येऊ लागली. मेरा लहू, दरिया दिल, सोने पे सुहागा, खून का कर्ज हे चित्रपट तिने साकारले पण यात म्हणावे तसे यश तिला मिळाले नाही. १९९१ साली अमिताभ बच्चनची हिरोईन म्हणून ‘हम’ चित्रपट तिने साकारला. चित्रपटासोबतच त्यातील ‘जुम्मा चुम्मा दे दे…’ हे तिच्यावर चित्रित झालेलं गाणं देखील सुपरडुपर हिट ठरलं. मात्र त्यानंतर किमीने चित्रपटातून काम करण्यास मनाई दर्शवली. एक दोन चित्रपटानंतर अनिल कपूर सोबत १९९२ सालचा ‘हमला’ हा शेवटचा चित्रपट तिने अभिनित केला. चित्रपटात तिचे फारसे मन रमेना, एकदा तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, वारंवार दुय्यम भूमिकेमुळे मी चित्रपट स्वीकारत नाहीये. इतकेच नाही तर तिने गोष्टींचा देखील ह्यावेळी उलगडा केलेला पाहायला मिळाला.

kimi katkar pic
kimi katkar pic

या शिवाय बहुतेक चित्रपट हे पुरुष प्रधानच असल्याने स्त्रीव्यक्तिरेखेला फारसे महत्व दिले जात नसायचे, किमीने असेही सांगितले होते की अनेकदा दुय्यम भूमिकेमुळे मला इतरांकडून चांगली वागणूक मिळत नसे. लोकांच्या वाईट नजरा आणि मागून अपशब्द तसेच टोमणे मारणे करणे …अशी तुच्छतेची वागणूक मिळू लागल्याने मला या क्षेत्रात फारसा इंटरेस्ट राहिला नाही त्यामुळे यापुढे मी चित्रपट स्वीकारणे बंद केले आहे. अनेक अभिनेत्रीना आजदेखील ह्याला सामोरे जावे लागते ह्याला काही पर्याय नाही हेही तितकंच सत्य. अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, अनिल कपूर ह्यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करूनही त्यांना ह्या इंडस्ट्रीत राहावेसे वाटले नाही.
असे असले तरी किमीने जवळपास ३० तरी चित्रपट या बॉलिवूड सृष्टीला दिले आहेत. चित्रपटातून एक्झिट घेतल्यावर किमी काटकरने फोटोग्राफर आणि ऍडफिल्ममेकर असलेल्या ‘शंतनू शौरी’ सोबत लग्न केले. लग्न करून ती मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे स्थायिक झाली. तिचा मुलगा सिद्धांत शौरी याला देखील फोटोग्राफीची आवड आहे आणि यातच तो आपले करिअर घडवत आहे. किमीचे पुण्यातील औंध येथील घरी नेहमीच येणे जाणे असते यानिमित्ताने ती भारताशी आजही जोडलेली पाहायला मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *