priyanka yadav actress pic

अगं बाई अरेच्चा! हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता अभिनेत्री तेजस्वीनी पंडित हिने ह्या चित्रपटातून विरोधी भूमिका साकारली होती तर संजय नार्वेकर आणि प्रियांका यादव यांनी प्रमुख नायक नायिकेच्या भूमिका बजावल्या होत्या. दिलीप प्रभावळकर, शुभांगी गोखले, सुहास जोशी, सिद्धार्थ जाधव यांनीही या चित्रपटात महत्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. अगं बाई अरेच्चा या चित्रपटामुळे प्रियांका यादव ही अभिनेत्री प्रसिद्धीच्या झोतात आलेली पाहायला मिळाली. यानंतर तिने काही मोजक्या मराठी चित्रपटात कामही केले. तिच्याबद्दल आणखी जाणून घेऊयात…

priyanka yadav actress
priyanka yadav actress

प्रियांका यादव पुण्यातील चिंचवड परिसरात वास्तव्यास आहे. तिचे वडील अजित यादव आणि आई कमल यादव हे दोघेही डॉक्टर. एसएनडीटी कॉलेजमधून तिने कम्युनिकेशन मीडिया फॉर चिल्ड्रन या विषयातून पदवी मिळवली. त्यानंतर तिने निर्मिती क्षेत्रात उतरण्याचे ठरवले परंतु याच दरम्यान तिला चित्रपटातून अभिनयाची संधी मिळाली. अगं बाई अरेच्चा!, हा मी मराठा, लेक लडकी, तुझीच रे यासारख्या चित्रपटातून प्रियंकाला अभिनयाची संधी मिळाली. काही वर्षांपूर्वी तिने “Victory Visions Entertainments” ही निर्मिती संस्था उभारली. यातून तिने “चुकलंच जरा डॉक्टर होऊन” या लघुपटाची निर्मिती केली होती. हा लघुपट ‘डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध’ म्हणून त्यावेळी चर्चेत आला होता यात विक्रम गोखले, अनिकेत विश्वासराव यासारख्या कलाकारांसोबत प्रियांकाने देखील महत्वाची भूमिका बजावली होती. डॉक्टरांची बाजू मांडलेल्या या लघुपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद देखील मिळाला होता. प्रियांका यादव आणखीन नवनवीन विषयांवर लघुपट बनवण्यात प्रयत्नशील आहे हिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *