sharmitha raut wedding

मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने नुकताच आपला साखरपूडा केला आहे. आज २१ जून म्हणजेच रविवारी इगतपुरी येथे अवघ्या ३५ लोकांच्या उपस्थितीत बिजनेसमन असलेल्या तेजस देसाई सोबत तीने हा साखरपुडा केल्याचे सांगितले आहे. तिने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की हा साखरपुडा ३१ एप्रिल रोजीच पार पडणार होता परंतु लॉकडाऊनमुळे ते शक्य झाले नाही. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून तसेच पाहुण्यांना फेसमास्क आणि ग्लोव्हजही देण्यात आले होते आम्ही हा साखरपुडा अगदी मोजक्या मित्रमंडळीसमवेत केला आहे माझ्याकडील काही मित्रमंडळी आणि तेजसकडील काही मित्रमंडळी अशी एकूण ३५ जणांनी या साखरपुड्याला उपस्थिती लावली होती.

marathi actress sharmishtha
marathi actress sharmishtha

हॉल मध्ये तेथील उपस्थितांव्यतिरिक्त बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला आम्ही आत येण्याची परवानगी दिली नाही. आजच्या परिस्थितीनुसार आमंत्रित केलेल्या लोकांना गरम जेवणाची सोयही केली होती परंतु वातावरण बदलामुळे आम्ही आईस्क्रीम अव्हॉईड करण्याचे ठरवले असल्याचे या मुलाखतीत तीने आवर्जून सांगितले. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत अनेक टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांसमोर आली. उंच माझा झोका, जुळून येती रेशीम गाठी, हे मन बावरे मालिकांमधील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंतीही मिळाली. शर्मिष्ठाचे पहिले लग्न अभिनेत्री अर्चना निपाणकर हिचा भाऊ अमेय निपाणकर सोबत झाले होते. दोघांतील वादामुळे तीने त्याच्यापासून कायदेशीररित्या घटस्फोट देखील घेतल्याचे बिग बॉसच्या शोमध्ये सांगितले होते. अमेय आणि शर्मिष्ठा यांचे नाते संपुष्टात आल्यानंतर तीने बिग बिसच्या शो मध्ये आपले मन रमवले. शोच्या फायनॅलिस्टपर्यंत देखील तीने आपले स्थान टिकवून ठेवले होते. शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई हे दोघेही आता लग्न कधी करणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागून राहिली आहे. याबाबत तिनेच खुलासा केला की, एकंदरीत परिस्थिती पाहूनच आणि योग्य वेळ पाहूनच आम्ही दोघे लवकरच लग्न करू अशी माहिती तिने या मुलाखतीतून दिली आहे. तूर्तास, शर्मिष्ठा आणि तेजस दोघांनाही साखरपुड्यासाठी खूप खूप शुभेच्छा!!!

sharmitha raut photo
sharmitha raut photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *