सध्या #meetoo अभियानामुळे अनेक अभिनेत्री आता सोशिअल मीडियावर आपल्या भावना आणि घडलेले प्रसंग शेअर जाताना दिसत आहेत. नाना पाटेकरवर तनुश्री दत्तने लावण्यात आलेल्या आरोपांना आता फेटाळले जात जरी असले तरी नानावर लावण्यात आलेला डाग लवकर पुसणे शक्य नाही. हिंदीच नाही तर आता काही मराठी अभिनेत्रीही #meetoo अभिनयावर बोलताना आपल्यावर घडलेले प्रसंग सांगताना दिसत आहेत. नुकताच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने जी सध्या हिंदी मालिकांत काम करते तिने आपल्यावर घडलेला प्रसंग सोशिअल मीडियावर शेअर केला आहे.

या अभिनेत्रीच नाव आहे सोनल वेंगुर्लेकर. तिने ह्याआधी अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. दिल दोस्ती डान्स, शास्त्री सिस्टर्स, ये वादा रहा आणि शास्त्री सिस्टर्स अश्या मालिकांमध्ये ती झळकली. सोनाली मूळची मुंबईची. कॉलेज करताकरता तिन मॉडेलिंग करायला सुरवात केली. एका मालिकेत इंटरव्हिव द्यायला गेली असता तीच तेथे रिजेक्शन झालं ती अवघ्या १९ वर्षांची होती. पण राजा बजाज यांनी तिला आपल्या रूम मध्ये बोलावून घेतलं. ते दारू प्यायले होते. तुला अभिनय जरी येत नसला तरी तू दिसायला खूप सुंदर आहेस तुला जर काम करायचं असेल तर मी तुला संधी द्यायला तयार आहे.
त्यासाठी तू तुझे सर्व कपडे काढून माझ्या समोर ये मी तुला तांत्रिक विद्या शिकवेन ज्यामुळे तू खूप यशस्वी होशील. तितकेच नाही तर राजा बजाज तिला टच हि करू पाहत होता. घडलेल्या घटनेवर तिने ताबडतोब प्रतिक्रिया देत आरडा ओरडा करत पळ काढला. तेथे इंटरव्हिवसाठी उपस्तित असलेली आणखीन एक मॉडेल आणि तिची आई यांनी मला खूप साथ दिली. मी पोलिसांत याची तक्रार हि केली, त्यावेळी ह्या दोघीनींही घालानास्तळी उपस्तित असल्याचं लेखी जबाब दिला. पण पोलिसांनी भलतच कारण देऊन केस राखडवून ठेवली. आजही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *