सोशल मीडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा फोटो सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. गुलाबी रंगाच्या स्कार्फमध्ये या अभिनेत्रीने आपला चेहरा लपवला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हि अभिनेत्री कोण? आणि ती स्कार्फने आपला चेहरा का लपवत आहे ? याबाबत अनेक चर्चा रंगलेल्या पाहायला मिळत आहे. खरं तर हि अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून “फुलपाखरू” फेम ऋता दुर्गुळे या अभिनेत्रीचा हा फोटो आहे. सध्या ऋता स्कार्फ बांधून प्रवास करताना आढळत असल्याने याबाबत स्वतः तिनेच असे का केले आहे याचा खुलासा केला आहे…

सध्या ऋता दुर्गुळे फुलपाखरू मालिकेत वैदेहीची भूमिका साकारत आहे.तिच्या या मालिकेला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. या सोबतच ऋता अभिनेता उमेश कामातच्या “दादा एक गुड न्यूज आहे ” नाटकात प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे. प्रदर्शनापूर्वीच पुणे, मुंबईतील बॅनरबाजीमुळे हे नाटक चर्चेत आले होते. हृताने याआधीही स्टार प्रवाह वरील दुर्वा मालिकेत काम केले होते. या मालिकामुळे ऋता घराघरात जाऊन पोहोचली .यामुळे ऋताचे अनेक चाहते ती कुठेही प्रवास करत असताना तिच्याभोवती गराडा घालताना दिसतात. ऋताला अनेक वेळा आपल्या प्रायव्हेट गाडीने प्रवास करावा लागतो परंतु कधीकधी ट्रेन, बस, मेट्रो सारख्या वाहनांचादेखील तिला वापर करावा लागतो. याच कारणामुळे ऋता प्रवास करताना नेहमी तोंडाला स्कार्फ बांधते.
परंतु असे केले तरी तिच्या हातावरील टॅटू आणि डोळे यावरूनदेखील तिचे चाहते तिला ओळखू लागले आहेत. स्कार्फमुळे चेहरा लपत असला तरी तिचे डोळे आणि हातावरील टॅटू सर्वानाच परिचयाचे आहेत. त्यामुळे तीने कितीही चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला तरी ती सहज ओळखली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *