ह्या मराठी अभिनेत्रीने केली पूरग्रस्त मुलींना तब्बल ५ कोटींची मदत. पूरग्रस्त मुलींच्या नावे तब्बल ५० हजार होणार जमा

कोल्हापूर, सांगली जिल्यातील पूरस्थिती निवळली असली तरी अनेक संसार पूर्ववत उभे राहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदतीची गरज भासत आहे. यासाठी देशभरातून अनेक हातांची मदत सढळ हाताने मिळताना दिसत आहे मराठी कलाकारांसोबत आता हिंदी सिने सृष्टी तसेच खेळाडूकडूनही निधी जमा होताना दिसत आहे. यातच मराठमोळी अभिनेत्री “दीपाली भोसले- सय्यद ” हिने आपल्या फाऊंडेशन द्वारे पुरग्रस्तांसाठी ५ कोटींचा निधी देऊ केला आहे. दीपाली भोसले- सय्यद हि मदत कशी आणि कोणासाठी करतेय ते सविस्तर जाणून घेऊयात …

दीपाली भोसले-सय्यद या येत्या शनिवारी १७ ऑगस्ट २०१९ रोजी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्त भागातील लोकांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. तेथील सुमारे १००० मुलींच्या लग्नाची जबाबदारी त्यांच्याच फाउंडेशन मार्फत घेणार असल्याचे जाहीर केले आहे. या प्रत्येक मुलीच्या नावाने ५०,००० रुपयांची मुदत ठेव पावती करून त्यातून त्यांची लग्न लावून देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद म्हणावे लागेल. या आणि अशा कित्येक मदतीच्या ओघाने अनेक उध्वस्त झालेले संसार पुन्हा उभे राहण्यास मदत मिळत आहे.
संपूर्ण मराठी कलाकार आपल्या परीने सर्वोतोपरी मदत जाताहेत हे पाहून दीपालीला त्याचा अभिमान आहे. मराठी माणूस आपल्या माणसाला दुःखाच्या वेळी मुळीच विसरू शकत नाही तो आपल्या मातीसाठी काहीतरी केल्याखेरीज स्वस्थ बसणार नाही आणि अगदी घडलेय हि तसेच ह्याचा दीपाली भोसले- सय्यद हिला सार्थ अभिमान आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *