अमिताभ बच्चन गेली अनेक वर्ष “कौन बनेगा करोडपती” ह्या गेम शो चे सूत्र संचालन करत आहेत. अवघ्या काही दिवसांतच हा शो चांगलाच लोकप्रिय झाला कोणी प्रश्नांची उत्तरे देऊन एका दिवसांत करोडपती होऊ शकतो हे अनेकांचं स्वप्न ह्या शो मुळे पूर्ण झालं. असाच एक स्वप्न मराठी अभिनेत्रींच्या पतीने पहिले आणि ते पूर्ण हि झालं. “कौन बनेगा करोडपती” या शोमध्ये हर्षवर्धन नवाथे यांनी २००० साली पार्टीसिपेट केले होते. या शोचे ते पहिलेवहिले ‘एक करोड’ चे विजेते पदाचे मानकरी ठरले होते. यामुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी देखील मिळाली होती. जवळपास वर्षभर त्यांच्या मागे एका सेलिब्रिटी प्रमाणे सही घेण्यासाठी गर्दी होताना त्यांनी अनुभवली होती.

हर्षवर्धन यांचे वडीलही आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत होते वडीलांप्रमाणेच हर्षवर्धन यांनादेखील आयएएस अधिकारी होण्याची ईच्छा होती. परंतु या शोमध्ये पार्टीसिपेट करून आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाल्याचे ते सांगतात. मिळालेल्या रक्कमेतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. तर मुंबईसारख्या ठिकाणी त्यांनी स्वतःचे घर आणि पहिली कार खरेदी केली होती. हर्षवर्धन यांच्या पत्नीदेखील मराठी चित्रपट, मालिका सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. २९ एप्रिल २००७ साली यांनी अभिनेत्रि “सारिका निलत्कर” यांच्यासोबत लग्न केले. त्यांना सारांश आणि रेयांश अशी दोन मुलेही आहेत. हर्षवर्धन ह्यांना आजही लोक पहिला करोडपती म्हणूनच ओळखतात.

सारिका निलत्कर- नवाथे यांनी “पहिली शेर दुसरी सव्वा शेर” चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबत काम केले आहे. एक डाव संसाराचा, अजिंक्य या चित्रपटात देखील त्या झळकल्या आहेत. चाणक्य, जास्वंदी यासारखे नाटकही त्यांनी साकारले आहेत. तर मध्यंतरी टाटा टी प्रीमियम च्या जाहिरातीत देखील त्या दिसल्या. त्यानंतर त्यांची कलर्स मराठीवरील ” कुंकू टिकली आणि टॅट्टू ” मालिकेत ‘विभा कुलकर्णी’ यांची भूमिका साकारली होती. आजही त्या अभिनय क्षेत्रात काम करीत आहेत इतका पैसे आणि प्रसिद्धी असूनही त्या पूर्वी प्रमाणेच सेटवर वेळीच हजर राहतात आणि इतरांशीही प्रेमाने जिव्हाळ्याने वागतात. करोडपती माणसाची हि करोडपती पत्नी असली तरी तिचे पाय जमिनीवर आहेत हीच खरी मराठी माणसाची ओळख म्हणता येईल. हर्षवर्धन आणि सारिका दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *