“ह्या” मराठमोळ्या प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केले डोहाळे जेवणाचे फोटो…अनेक सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा

नुकतेच मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या फेसबुक पेजवरून डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले आहेत. काही वेळातच तिने शेअर केलेल्या त्या फोटोना सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव झालेला पाहायला मिळाला. बऱ्याच दिवसांच्या गॅपनंतर ही अभिनेत्री प्रेक्षकांसमोर येत आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे “सारा श्रवण”. सारा श्रवण या अभिनेत्रीने बीकॉमची पदवी मिळवली. त्यानंतर तीने रंगभूमीवर पदार्पण करत अनेक नाटके गाजवली. भाग्यलक्ष्मी, पिंजरा, तू तिथे मी ,एका पेक्षा एक सारख्या लोकप्रिय मालिकेतून तिला विविधांगी भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

मराठीतील चित्रपटात आयटम सॉंग करूनही ती काही काळ चर्चेत राहिली होती. मुंगळा, यारो की यारी चित्रपट तिने साकारले. मराठी मालिकेत हि तिने आपल्या अभिनयाची छाप उमठवलेली पाहायला मिळाली.
२४ एप्रिल २०१४ रोजी साराने गणेश सोनवणे सोबत थाटात लग्न पार पाडले. गणेश सोनवणे यांनी ebay india मध्ये मॅनेजर पदाचा भार सांभाळला आहे. सारा ने काही दिवसांपूर्वीच आपल्या फेसबुक पेजवरुन डोहाळ जेवणाचे फोटो शेअर केले आहेत. तिने कडलेल्या ह्या फोटोंना सेलिब्रिटी वर्गाकडून तुफान प्रतिसाद मिळाला आणि अल्पावधीतच अनेक चाहत्यांकडून शुभेच्छा देखील मिळवल्या. अभिनेत्री सारा श्रवण हिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *