फोटोत दिसणाऱ्या ह्या गोंडस मुलीबद्दल आपण आज जाणून घेऊयात.. फोटोत दिसणारी हि गोड़ मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून रात्रीस खेळ चाले ह्या मालिकेतील शेवंता आहे. अगदी लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड मुंबईतील डी जी रुपारेल येथून अपूर्वाने आपले शिक्षण पूर्ण केले. “आभास हा ” या झी मराठी वरील मालिकेतून अपूर्वा नेमळेकर छोट्या पडद्यावर झळकू लागली. त्याचप्रमाणे स्टारप्रवाह वरील “आराधना” या मालिकेलाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. “एका पेक्षा एक” ह्या शो मध्येही तिने पार्टीसिपेट केले होते पण त्यात तिला हवं तस यश संपादन करता आलं नाही.

कलर्स मराठीवरील “तू माझा सांगाती” या मालिकेत तिने सोयराबाई उत्तम साकारली होती. “चोरीचा मामला” या तिने साकारलेल्या विनोदी नाटकाचे अनेक प्रयोग सादर करण्यात आले. “आलाय मोठा शहाणा” या नाटकातील आशिष पवार सोबतची केमिस्ट्री चांगलीच जुळून आली. “ईश्क वाला लव्ह” मध्येही तिने भुमिका बजावली आहे. तसेच ” जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्स ” या ब्रँड साठी तिने मॉडेल म्हणून काम पाहिले आहे. शेवटची भूमिका करताना तिला असलेल्या गोंडस मुलाप्रमाणेच मीही खोडकर होते तिला पाहून मला माझ्या बालपणाची आठवण येते असे सांगत तिने तिच्या बालपणीचे काही फोटो सोशिअल मीडियावर शेअर केले होते. बघता बघता त्या फोटोना लाखो लाईक्स आले. आपल्या अदाकारीने शेवंताने अनेक चाहत्यांना घायाळ केले तिचा अभिनय नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. अपूर्व नेमळेकर हिला पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *