ह्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती करायचा मुलीला अश्लील मेसेजेस.. अभिनेत्रीने केला असा काही खुलासा कि पोलिसांचेही होश उडाले

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी आपल्या पतीच्या छळाला कंटाळून पोलीस केस केल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या परंतु नुकत्याच या घटनेचा खुलासा झाला आहे की, अभिनेत्री श्वेता तिवारी नाही तर तिची मुलगी पलक ही या घटनेची शिकार बनली असल्याचे उघड झाले आहे. श्वेता तिवारी हिने अभिनेता राजा चौधरी याच्यासोबत लग्न केले होते परंतु राजा चौधरीच्या गैर वर्तणुकीमुळे तिने त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

मुलगी पलक हिच्यासोबत ती आपले आयुष्य सुखाने जगत असताना तिची ओळख टीव्ही अभिनेता अभिनव कोहली सोबत झाली. २०१३ साली दोघांनी लग्नही केले. पलक हिला आपलीच मुलगी समजून त्याने तिचा सांभाळ केला.
परंतु मागील काही दोन वर्षांपासून अभिनव हा पलकला अश्लील मेसेजेस आणि फोटो दाखवून त्रास देऊ लागला. ही गोष्ट तिने तिच्या आईपासूनही लपवून ठेवली होती. या गोष्टींमुळे आईच्या प्रसिद्धीवर काही परिणाम होईल या विचारापोटी तिने ही बाब तिच्यापासून लपवून ठेवली होती. परंतु या गोष्टीचा जास्तच त्रास होऊ लागल्याने अखेर तिने ही बाब श्वेताला सांगितली. ही गोष्ट ऐकून श्वेताला धक्का बसला लगेचच तिने पोलीस ठाणे गाठून आपला दुसरा पती अभिनव च्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. यावर कठोर पावले उचलत पोलिसांनीही अभिनवला ताबडतोब बेड्या ठोकल्या. श्वेता पोलीस ठाण्यात दाखल झाल्यावर तिच्याबाबत मीडियावर घरगुती हिंसेची शिकार म्हणून बातम्या पसरू लागल्या परंतु आता तिची मुलगी या घटनेची शिकार झाली असल्याचे उघड झाले आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *