ह्या कारणामुळे CID मालिका सोनी चायनलला बंद करावी लागली.

“दया तोड दो दरवाजा” असा acp प्रद्युमन यांचा डायलॉग अखेर २१ व्या वर्षी संपला. मालिका २१ जानेवारी १९९८ साली सुरु झालेली, मालिकेने तब्बल १५४७ एपिसोड केले. पण अखेर मालिका इतक्या घवघवीत यशानंतर आता बंद करण्यात आली. मराठीचा अव्वल दर्जाचा कॉमेडी शो “चला हवा येऊ द्या” ह्या कार्यक्रमांत हि बऱ्याच भागात CID वर आधारित कॉमेडी दाखवण्यात आली. इतकंच नव्हे तर तामिळ आणि मल्याळम भाषेतल्या शो मधेही CID वर आजही जोक मारले जातात .

ऑक्टोबर २०१८ म्हणजे मागच्याच महिन्यात सोनी टीव्हीने ऑफिशिअल अनोसमेन्ट करून मालिका संपली असं जाहीर केलं. पण मालिका इतक्या जबरदस्त फॉर्म मध्ये असताना ती बंद का करण्यात आली असा अनेकांनी सवाल उठवला. #savecid अशी विनवनीही अनेकांनी सोशिअल मीडियावर केली पण त्याचा काही उपयोग झाल्याचं दिसलं नाही. डायरेक्टर आणि प्रोड्युसर बी. पी. सिंग यांनी ह्याबाबत खुलासा केला. ते म्हणाले cid मालिका सोनी टीव्ही मागच्या दोन वर्षांपासून बंद करण्याच्या प्रयत्नात होती. मालिकेचे संपूर्ण राईट्स सोनी टीव्हीला आहेत. सोनी टीव्ही असं का करत आहे असं विचारलं असता त्यांचं म्हणणं होत कि मालिकेचा टीआरपी खूप खालावला आहे त्यामुळे ती बंद करावी लागतेय. पण सत्य काही वेगळंच होत.
मालिका आजही तितकीच पहिली जाते जितकी गेल्या ४-५ वर्षांपासून पहिली जाते. आम्ही मालिकेत काही बदल करायला हवे होते त्यांच्या म्हणण्यानुसार रोज रोज तेच पाहून लोक कटलेट २१ वर्ष आम्ही मालिका दाखवली पण आता काळानुसार आम्हालाही बदलायला हवं. पण रसिकांना आजही मालिका आवडते मग आम्ही बदल करायचं कारणच काय? लोकांना आजही तेच आवडत जे पूर्वी आवडायचं. त्यामुळे टीआरपी आहे तसाच आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *