priya berde actress

अशी ही बनवाबनवी या चित्रपटाच्या मध्यमातून प्रिया बेर्डे यांनी मराठी चित्रपट सृष्टीत आपले पहिले पाऊल टाकले होते. यानंतर एक गाडी बाकी अनाडी, घनचक्कर, येडा की खुळा, अफलातून अशा धमाल मराठी चित्रपटासोबतच बेटा, अनाडी, हम आपके है कौन सारख्या हिंदी चित्रपट सृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. प्रिया बेर्डे यांना अभिनयाचे हे बाळकडू अगदी त्यांच्या घरातूनच मिळाले होते. त्यांचे वडील अरुण कर्नाटकी हे प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून ओळखले जात. हिंदी चित्रपट अभिनेत्री नंदा कर्नाटकी या प्रिया बेर्डे यांच्या आत्या तर अभिनेत्री लता काळे या प्रिया बेर्डे यांच्या आई. अरुण कर्नाटकी यांच्यासोबत लग्न केले त्यानंतर लता काळे या लता अरुण या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या.

ahok saraf and shahaji
ahok saraf and shahaji

लता अरुण या रंगभूमीवरील जाणत्या कलाकार १० लाखाचा धनी, नटसम्राट या गाजलेल्या नाटकांसोबतच त्यांनी जय रेणुकादेवी यल्लमा, एक गाडी बाकी अनाडी अशा मराठी चित्रपटातून अभिनय साकारला आहे. प्रिया बेर्डे यांचे मामा म्हणजेच लता अरुण यांचे भाऊ शहाजी काळे हे देखील मराठी सृष्टीतील अभिनेते तसेच निर्माते म्हणून ओळखले जातात. तर अभिनेत्री आणि लावणी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माया जाधव या प्रिया बेर्डे यांच्या मामी. प्रिया बेर्डे अगदी लहान असल्यापासूनच आपली मामी माया जाधव यांच्याकडून नृत्याचे धडे गिरवत असत. वयाच्या बाराव्या वर्षांपासूनच प्रिया बेर्डे आपल्या मामीसोबत देश विदेशात नृत्याचे वेगवेगळे कार्यक्रम सादर करत. त्यांचे मामा शहाजी काळे आणि मामी माया जाधव या दोघांनी अनेक नाटकांमधून एकत्रित काम केले आहे. पिंजरा, चांडाळ चौकडी, लक्ष्मीची पाऊले हे माया जाधव यांनी अभिनित केलेले मराठी चित्रपट. अशा अनेक चित्रपटातून त्यांच्या नृत्याला नेहमीच प्राधान्य दिलेले पाहायला मिळायचे. बाईचं ऐका गाडीभर पैका, अठरावं वरीस लग्नाचं या नाटकांतून दोघांनी एकत्रित काम केलं आहे. त्यातील आठरावं वरीस लग्नाचं या नाटकाची निर्मिती शहाजी काळे यांनी केली आहे. एक उनाड दिवस, बरड, सुर्ज्या अशा मराठी चित्रपटातून शहाजी काळे प्रेक्षकांसमोर आले.

maya jadhav priya berdes mami
maya jadhav priya berdes mami

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *