हे मराठी अभिनेता आणि अभिनेत्री लवकरच करणार लग्न.. एकाच मालिकेत आणि नाटकांत केली होती कामे

“दिल दोस्ती दुनियादारी” ह्या झी वाहिनीच्या मालिकेला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर हीच मालिका काही कालावधीनंतर त्याच कालाकारांसमवेत प्रेक्षकांसमोर सादर झाली, परंतु तिला म्हणावा तेवढा प्रतिसाद न मिळाल्याने मालिका आटोपती घेण्यात आली. याच मालिकेतून अभिनेता सुव्रत जोशी आणि सखी गोखले यांच्यातील मैत्री वाढत गेली. या मैत्रीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. अनेक सोशिअल माध्यमांमध्ये दोघांचे फोटो व्हायरल झाले आणि लग्न कधी करणार असा चाहत्यांनी तगादा लावला.

काही महिन्यांपूर्वी सखी आणि सुव्रत दोघेही एकत्रित “अमर फोटो स्टुडिओ” साकारत होते. परंतु सखीला उच्च शिक्षणासाठी परदेशात जावे लागणार होते त्यामुळे ह्या प्रोजेक्ट मधून तिने एक्झिट घेतली होती. सखी शिक्षणासाठी परदेशात गेली असली तरी सुव्रत तिला तिथे भेटण्यासाठी आवर्जून गेला होता. त्याचे फोटो देखील एकमेकांनि आपल्या इन्स्टाग्राम वर शेअर केले होते.
यासोबतच सुव्रतने सखी साठी एक चिठ्ठी देखील लिहिली होती. यावरून दोघे कधी लग्न करणार? अशा चर्चांना उधाण आलेले पाहायला मिळाले. यावर सखीला देखील तिच्या चाहत्यांनी हाच प्रश्न विचारला होता. यानंतर सखी आणि सुव्रत येत्या ११ एप्रिलला लग्न करणार असल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे आणखी एक कलाकार जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार असे म्हणायला हरकत नाही. परंतु हे दोघेही लग्न कुठे करणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *