भारताच्या हितासाठी जे आजीवन लढले अनेक खस्ता खाल्य्या अश्या महात्मा गांधीजींना सध्या डावरण्याचा प्रयत्न होतोय सोशीअल मेडीयावर महात्मा गांधी हे कसे मस्तीखोर, अय्याश स्वभावाचे होते आणि त्यांना विदेशी सुंदर स्त्रियांसोबत नृत्य करायला कसे आवडायचे, असे वर्णन असलेले छायाचित्र सध्या समाजमाध्यमांवर फिरत आहे. असेच अशी अनेक छायाचिटत्रे व्हॉट्सअ‍ॅपवर ‘व्हायरल होत आहेत. यात गांधीजी एका विदेशी महिलेसोबत नृत्य करीत असल्याचे दिसत आहेत.

परंतु हे छायाचित्र खरे नाही. एका ऑस्ट्रेलियन कलाकाराने सिडनी येथे झालेल्या सोहळ्यात गांधींसारखी वेशभूषा धारण करून तरुणीसोबत नृत्य केले होते. विशेष म्हणजे, या छायाचित्राविषयीचा खरेपणा अनेकांनी वारंवार सिद्ध करूनही काही जण बदनामीच्या उद्देशाने नृत्याचे छायाचित्र प्रसारित करीत आहेत. इतकेच नव्हे तर त्यांची बदनामीची करीत आहेत.

चित्रात दाखवल्याप्रमाणे फोटोशॉपचा वापर करून अशी चित्रे एडिट केली जातात हुबेहूब आणि जशीच्यातशी त्याकाळची असल्याचेही भासवले जातात. आणि फोटोवर मंजकुर लिहून तो व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक वर व्हायरल केला जातो. यामुळे आपण काय शेअर करत आहोत याची कल्पनाही बऱ्याच लोकांना येत नाही दिसत म्हणून शेअर करा आणि पाहताच क्षणी लाईक करा असा मजकूर लिहून हि चित्रे आपल्यला खरी आहेत अशीच वाटतात.

अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले अश्या या महान माणसाची कृपया माहिती नसलेल्या फोटोला सोशिअल मीडियावर महत्व देऊ नये हीच विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *