aniket ashok saraf pic

अशोक आणि निवेदिता सराफ अनेक दशके मराठी रंगभूमीवरून मराठी लोकांचं मनोरंजन करताना पाहायला मिळतात. तरुण वयात आणि आज साकारणाऱ्या अभिनयात कुठेही तडजोड पाहायला मिळत नाही ह्यातूनच हे कलाकार किती मेहनती आणि कामाशी एकनिष्ठ असल्याचे समजते हेच त्यांच्या यशाचं गुपित म्हणावं लागेल. बहुतेक करून कलाकारांची मुले ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्राकडे वळालेली पाहायला मिळतात. याला अपवाद म्हणून अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या मुलाने म्हणजेच अनिकेत सराफ याने एक उत्कृष्ट शेफ होण्याकडे भर दिलेला दिसला. परंतु तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की अनिकेत सराफ हा उत्कृष्ट शेफ तर आहेच परंतु त्याने अभिनय क्षेत्रात देखील यशस्वी पाऊल टाकलेले पाहायला मिळत आहे. अनिकेत म्हणजेच निक सराफ ह्याच्या बद्दल आणखीन जाणून घेऊयात …

nivedita ashok saraf family pic
nivedita ashok saraf family pic

वयाच्या ८ व्या वर्षी शाळेत शिकत असताना अनिकेत सराफने नाटकांमधून काम केले होते. कॉलेजमध्येही तो नाटकांतून छोट्या मोठ्या भूमिका बजावत होता, परंतु पहिल्यांदाच त्याने (मुकाभिनय) Pantomime: The Wizard Of The Oz या कॅनडाच्या व्यावसायिक नाटकातून अभिनयास सुरुवात केली आहे. या नाटकात त्याने “ग्लिण्डा” (good witch )हे पात्र साकारले आहे. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन देखील स्वतः अनिकेत सराफ यानेच केले आहे. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांना आपल्या मुलाने करिअर म्हणून कोणते क्षेत्र निवडावे याची बंधने कधीच लादली नाही. उलट त्यांना आपल्या मुलाचे नेहमी कौतुकच वाटावे अशीच कामगिरी करून दाखवताना तो दिसत आहे. अनिकेतला परदेशी भाषा अवगत असून तो फ्रेंच भाषा अगदी अस्खलित बोलतो त्यामुळे स्थानिक लोकांनाही तो तिथलाच असल्याचे वाटते. याशिवाय कॅनडात तो इंग्रजी भाषा शिकवण्याचे काम देखील करत आहे. आपल्या आई वडिलांचा आधार घेऊन तो मराठी सृष्टीत अगदी सहजपणे भूमिका मिळवू शकला असता पण त्याने तसे न करता आपल्या कलेचं कौशल्य दाखवत परदेशात राहून आपले पाय भक्कम करताना दिसतोय.

aniket saraf actor in
aniket saraf actor in

लहानपणापासूनच अनिकेतला लिखाणाची आवड इंग्रजी भाषेतून कविता लिहिणे हा त्याचा एक छंदच होता. त्याने स्वतः एक हिंदी शॉर्ट फिल्म देखील तयार करून त्याचे दिग्दर्शन, लेखन केले होते. त्यातील गाणी देखील स्वतःच लिहून ती संगीतबद्ध देखील केली होती. मध्यंतरी Global Affair नावाने त्याने स्वतःचे हॉटेल देखील उभारले होते. पुढे परदेशात जाऊन काहीतरी करून दाखवायचे स्वप्न मनाशी पक्के केले. तिथे जाऊन वेगवेगळ्या भाषांचे ज्ञान अवगत केले. मग अगथा क्रिस्टी यांच्या “स्पायडर्स वेब”, “माउस ट्रॅप” या परदेशी नाटकातही त्याने महत्वाची भूमिका बजावुन अभिनयाकडे वाटचाल सुरू केली. आज तो अभिनय, लेखन, दिग्दर्शन, शिक्षक, गीतकार यासोबतच एक उत्कृष्ट शेफ म्हणून आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या भूमिका उत्तमोत्तम बजावताना पाहायला मिळत आहे. एका व्यक्तीमध्ये इतके कलागुण ठासून भरलेला हा कलाकार आपल्या आयुष्यात कुठेही कमी पडणार नाही याची शाश्वती आपोआप मिळवून देतो. यावरून तो आपल्या आईवडिलांप्रमाणे अभिनयाचा वारसा तर जपताना दिसतच आहे शिवाय वेगळे काहीतरी करून दाखवण्याचा ध्यास देखील तो अंगी बाळगतो आहे. परदेशाप्रमाणे भारतात येऊन त्याने मराठी सृष्टीसाठी काहीतरी करावे अशी आशा आता त्याच्याकडून व्यक्त केली तर काही वावगे ठरायला नको. अनिकेत सराफ यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *