ही मराठमोळी अभिनेत्री साकारणार बॉलिवूड मधील “चंबळची राणी”…फोटो पाहून थक्क व्हाल

सुशांत सिंग राजपूत, आशुतोष राणा, मनोज वाजपेयी, रणवीर शौरी ही मोठी स्टार कास्ट असलेला “सोनचिडीया” हा बॉलिवूड चित्रपट ८ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रेलशकांच्या भेटीला येत आहे.या चित्रपटातून चंबळचा इतिहासातील थरार मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. यात चंबळची राणी या प्रमुख भूमिकेसाठी भूमी पेडणेकर या मराठमोळ्या अभिनेत्रीची निवड करण्यासाठी आली आहे. भूमी पेडणेकर ही मुंबईत वाढलेली मुलगी. तिचे वडील महाराष्ट्रीयन तर आई हरियाणाची आहे. आर्य विद्यामंदिर जुहू येथून तिने आपले शिक्षण घेतले आहे.

अभिनय क्षेत्रात येण्याआधी तिने ६ वर्षे असिस्टंट कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम पाहिले आहे. “दम लगाके हैशा ” हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट. या पहिल्याच चित्रपटातील तिच्या अभिनयाला फिल्मफेअर पुरस्काराने नावाजले आहे. लस्ट स्टोरीज, टॉयलेट एक प्रेम कथा सारख्या गाजलेल्या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारण्याची संधी तिला मिळाली. आता ती चक्क सुशांत सिंग राजपूत सोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. “सोन चिडीया ” या तिच्या आगामी चित्रपटात ती चंबळची राणी साकारताना दिसत आहे.
ह्या चंबलच्या दहशतीच्या इतिहासाचा थरार चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. भूमी पेडणेकर हिला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *