ही मराठमोळी अभिनेत्री आहे प्रोफेशनल स्टंट रायडर…चक्क देते भारतीय सैन्यदलातील जवानांना ट्रेनिंग

मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेलं एक अनोखं व्यक्तीमत्व म्हणजे मराठमोळी अभिनेत्री स्मिता गोंडकर होय. आपल्या या अनोख्या छंदामुळे स्मिताने यशाची शिखरे गाठली आहेत. २००९ सालच्या MTV stunt mania या रिऍलिटी शोमध्ये तिने उत्तम कामगिरी करून एकमेव महिला सेमी फायनलिस्ट चा मान मिळवला. एवढेच नव्हे तर ती भारतीय सैन्य दलातील जवानांना ट्रेनिंग देऊन आपले नाव लौकिक करत आहे.

स्मिताचा जन्म १८ एप्रिल १९८४ साली झाला . फर्ग्युसन कोलेजमधू तिने शिक्षण घेतले. महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट मधून तिने हॉटेल मॅनेजमेंट ची पदवी प्राप्त केली. शाळेत असल्यापासून तीला नाटक, रॅम्प वॉक करण्याची आवड होती. तिने मॉडेलिंगही केले आहे. ती एक प्रोफेशनल स्टंट रायडर तर आहेच पण तिने जुडो आणि मार्शल आर्ट चे प्रशिक्षणही घेतले आहे. ‘मुंबईचा डबेवाला ‘ या चित्रपटाद्वारे तिने मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले. विजय दीनानाथ चौहान, वॉन्टेड बायको नं. १, हिप हिप हुर्रे ,जस्ट गंमत, या मराठी चित्रपटात तिने काम केले. पण तिच्या ‘पप्पी दे पप्पी.. ‘ या म्युजिकल गाण्यामुळे जबरदस्त हिट मिळवून दिली.

स्मिताने सिद्धार्थ बाठीया या बीजनेसमन सोबत २०११ साली लग्न केले. तिचे हे लग्न अनेक वादाच्या भोवऱ्यात सापडले. यातून सावरत आता ती मराठी बिग बॉस मध्ये कंटेस्टंट म्हणून आली आहे. स्मिता गोंडकर हि पूर्वी इतकी ती फिट राहिली नसली तरी ती पुन्हा फिट राहून पूर्वीप्रमाणे स्टण्ट करणार असल्याची कबुलीही तिने मराठी बिग बॉस च्या सेटवर आपल्या चाहत्यांना दिली आहे. तिच्या पुढील आयुष्यात तिने यशाची अनेक शिखरे गाठावीत असे तिच्या चाहत्यांना नक्कीच वाटत असेल. तिच्या पुढच्या वाटचालीसाठी आपल्याकडून तिला खूप खूप शुभेच्छा..

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *